शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

शाईफेकीनंतर राजकारण तापलं..! हे वारकरी संप्रदायाला शोभतं का ? रोहित पवारांचा संतप्त सवाल (video)

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2026 20:29 IST

घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत निषेध आंदोलन सुरू केले.

उरुळीकांचन / लोणीकाळभोर : पुण्यातील म्हातोबाची आळंदी येथे शनिवारी सकाळी राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर कीर्तनकार संग्राम भंडारे आणि त्यांच्या समर्थकांकडून शाईफेक करण्यात आल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत निषेध आंदोलन सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. आमदार रोहित पवार यांनी आंदोलनस्थळी भेट देत संबंधित घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला. “धमक्या देणे, शाईफेक करणे आणि अशा मार्गाने प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणे हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि वारकरी संप्रदायाला शोभणारे नाही,” असे ते म्हणाले.



रोहित पवार यांनी पुढे बोलताना वारकरी परंपरेचा उल्लेख करत, “खरे वारकरी संतांचा विचार पुढे नेत असतात. ते शिवीगाळ, धमक्या किंवा बंदूक दाखवण्यासारखे प्रकार करत नाहीत. जर कोणी बंदूक घेऊन फिरत असेल किंवा घुसखोरी करत असेल, तर तो गंभीर विषय आहे,” असा इशाराही दिला.

यावेळी त्यांनी काही तथाकथित धार्मिक नेत्यांवरही अप्रत्यक्ष टीका केली. “या भोंदू महाराजांच्या गुरुंनी सुरू केलेल्या शाळांमध्ये बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो का?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी सामाजिक समतेचाही मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून तातडीने अटक करण्यात यावी, तसेच विकास लवांडे यांना पोलिस संरक्षण द्यावे, अशी मागणीही रोहित पवार यांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे. घटनेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, आगामी काळात या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ink attack sparks politics! Does this suit the Warkari tradition?

Web Summary : Ink was thrown on NCP spokesperson Vikas Lavande, escalating political tensions. MLA Rohit Pawar condemned the act, questioning if such behavior aligns with Warkari values. He demanded action against the perpetrators and protection for Lavande, highlighting the need for social equality.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRohit Pawarरोहित पवारPuneपुणेNCPराष्ट्रवादी काँग्रेस