शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

Video : सॅल्यूट! पुण्यात वाहतूक पोलीस महिलेने रस्त्यावर झाडू फिरवत दाखविली 'कर्तव्यदक्षता'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 22:04 IST

टिळक रस्ता हा तसा पुणे शहरातील नेहमीच गजबजलेला रस्ता म्हणून परिचित आहे.

पंकज बिबवे - पुणे : गेल्या काही दिवसांत वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांवर होणारे हल्ले वाढले आहे. विश्रांतवाडीमध्ये नुकतीच एका वाहतूक पोलीसमहिला कर्मचाऱ्याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. ऊन, वारा, पाऊस यामध्ये आपले कर्तव्य एकनिष्ठतेने बजावत असताना खाकी वर्दीतले पोलीस काय किंवा वाहतूक पोलीस कर्मचारी हे कधीच कसूर करत नाही. आजदेखील याचा प्रत्यय पुणे शहरात एका गजबजलेल्या रस्त्यावर आला. आणि 'तो' प्रसंग पाहून येणाऱ्या जाणाऱ्या तोंडून फक्त कौतुक आणि कौतुकच ऐकायला मिळत होते.   

टिळक रस्ता हा तसा पुणे शहरातील नेहमीच गजबजलेला रस्ता म्हणून परिचित आहे. सोमवारी सायंकाळी या रस्त्यावर एस. पी कॉलेज चौकात रिक्षा आणि दुचाकीस्वाराची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने झालेल्या या अपघातात कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. परंतु, दुचाकी अणि रिक्षा यांच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले. यामुळे भर चौकात रस्त्यावर काचांचा खच साचला होता.

याचवेळी तेथे खडक वाहतूक विभागाचे एक महिला व एक पुरुष वाहतूक पोलिस वाहतूक नियमन करत होते. अपघात झाल्याचे कळताच त्यांनी वाहतूक तर सुरळीत करून दिली. परंतु याचबरोबर रस्त्यावर साचलेल्या काचांमुळे इतर कोणाचाही अपघात घडू शकतो या भावनेने तिथे असलेल्या खडक वाहतूक विभागातील वाहतूक पोलिस रजिया फैयाज सय्यद यांनी जबाबदारीच्या भावनेतून शेजारीच असलेल्या अमृततुल्यमधील झाडू स्वतः हातात घेऊन रस्त्यावरच्या काचा बाजूला केल्या. या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानतेमुळे अनेक अपराध रोखले गेले. त्यामुळे चौकातील ये-जा करणारा प्रत्येकजण त्या वाहतूक महिला कौतुक करण्यास विसरला नाही. 

टॅग्स :Puneपुणेtraffic policeवाहतूक पोलीसWomenमहिलाAccidentअपघातtwo wheelerटू व्हीलरauto rickshawऑटो रिक्षा