डर के आगे जीत है; पुण्यात आजपर्यंत ३५ हजार रुग्णांची कोरोनावार यशस्वी मात!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 02:45 PM2020-08-01T14:45:40+5:302020-08-01T14:50:46+5:30

ही आकडेवारी पुणेकरांची आशेचा किरण..!

Victory after fear ; 35000 Patients were successfully recovered from corona in Pune till date! | डर के आगे जीत है; पुण्यात आजपर्यंत ३५ हजार रुग्णांची कोरोनावार यशस्वी मात!

डर के आगे जीत है; पुण्यात आजपर्यंत ३५ हजार रुग्णांची कोरोनावार यशस्वी मात!

Next
ठळक मुद्दे१ हजार १८५ कोरोनाबाधित कोरोनामुक्त होऊन परतले घरी

पुणे : पुणे शहर, पिंपरी- चिंचवड आणि ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढते ही वास्तव परिस्थिती  आहे. या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहे. याच दरम्यान पुणे शहरातुन एक दिलासादायक आणि आत्मविश्वास वाढवणारी बातमी समोर येते आहे. शुक्रवारी १ हजार १८५ कोरोनाबधित रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे पुणे शहरात कोरोनावर यशस्वी मात करणाऱ्यांची संख्या आता ३५ हजार १२३ वर पोहचली आहे.ही आकडेवारी निश्चितच पुणेकरांसाठी आशादायी ठरणारी आहे.  

कोरोनाबाधितांच्या झपाट्याने वाढणाऱ्या संख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेकडून १ ते ३१ ऑगस्टपर्यंतच्या नवीन लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून त्याची नियमावली देखील जाहीर करण्यात आली आहे. त्याचे कठोर पालन करणे बंधनकारक असणार आहे. 

शुक्रवारी (दि. ३१) ८१८ नव्या कोरोनाबधित यांना विविध रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, दिवसभरात २८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
      
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ६२६ जण व्हेंटिलेटरवर असून २ हजार १४८ रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. आजपर्यंत शहरात एकूण ५४ हजार २५५ जणांना कोरोना बाधित झाले असले तरी, सद्यस्थितीला अ‍ॅक्टिव रूग्ण संख्या ही १७ हजार ८२० इतकी आहे़. तसेच आतापर्यंत ३५ हजार १२३ जण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत.
        
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर तब्बल ६ हजार १५१ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत २ लाख ७३ हजार २९२ जणांची तपासणी करण्यात आली आहे.
--------

Web Title: Victory after fear ; 35000 Patients were successfully recovered from corona in Pune till date!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.