शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

‘वंचित’ची २८८ जागा लढविण्याची मोर्चेबांधणी, कपबशी गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2019 06:20 IST

निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीची कपबशी गायब करून गॅस सिलिंडर हे चिन्ह दिले आहे.

- धनाजी कांबळेपुणे : निवडणूक आयोगाने विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीची कपबशी गायब करून गॅस सिलिंडर हे चिन्ह दिले आहे. वंचित आघाडीनही २८८ जागा लढविण्याची तयारी केली आहे. त्यांना आता मतदारांंपर्यंत पुन्हा नवे चिन्ह पोहोचविण्याची कसरत करावी लागणार आहे.निवडणूक आयोगाने कपबशी हे चिन्ह आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेला दिले आहे. त्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांना आता ‘सिलिंडर’ घरोघरी पोहोचविण्यासाठी कसरत करावी लागेल. वंचितच्या सर्व उमेदवारांसाठी हे एकच चिन्ह असेल. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत वंचितने तब्बल ४१ लाख मते घेतली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास विधानसभा निवडणुकीत कसा टिकतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.‘वंचित’ने ठिकठिकाणी उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा सपाटा सुरू केला होता. मात्र, पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुरामुळे ही प्रक्रिया मंदावली होती. काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे आणि विजय वडेट्टीवार यांनी मुंबईतील राजगृहावर अ‍ॅड. आंबेडकर यांची नुकतीच भेट घेतली. मात्र, जागावाटपाबाबत तोडगा निघालेला नाही. आंबेडकर आणि गोपीचंद पडळकर यांनी काँग्रेसला ३१ जुलैचा अल्टिमेटम दिला होता. त्यामुळे आघाडीबाबत साशंकता असल्याने कार्यकर्त्यांनी सर्वच जागा लढविण्याची तयारी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली.काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत चर्चा सुरु आहेत. मात्र, अद्याप तोडगा निघालेला नाही, असे ‘वंचित’चे प्रवक्ते अमोल पांढरे यांनी सांगितले.काँग्रेसकडून ९६ जागांची आॅफरविधानसभा निवडणुकीसाठी वंचितसोबत महाआघाडी करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस इच्छुक असून, त्यासाठी नवा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने ९६ जागा देण्याची आॅफर दिली आहे. मात्र हा प्रस्ताव अमान्य करून, काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांच्या कोट्यातील काही जागा इतरही पक्षांना वाढवून द्याव्यात, अशी मागणी अ‍ॅड प्रकाश आंबेडकर यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी