शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

आईशी जोडला अनोखा ‘लिव्हर’पूल

By admin | Updated: July 2, 2014 01:50 IST

वात्सल्यसिंधू आई, प्रेमस्वरूप आई’चे वात्सल्य लाभावे, यासाठी एका मुलाने आईसाठी आपल्या यकृताचे दान केले. यकृत निकामी झाल्याने मृत्यूशी झुंज देणाऱ्या आईचे प्राण वाचविले

पुणे : ‘वात्सल्यसिंधू आई, प्रेमस्वरूप आई’चे वात्सल्य लाभावे, यासाठी एका मुलाने आईसाठी आपल्या यकृताचे दान केले. यकृत निकामी झाल्याने मृत्यूशी झुंज देणाऱ्या आईचे प्राण वाचविले. पुण्यातील ग्लोबल रुग्णालयात ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली. उपचारानंतर दोघांचीही प्रकृती उत्तम असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. ग्लोबल रुग्णालयातील यकृत तज्ज्ञ डॉ. मोहंमद रेला, डॉ. हेमंत वडेयार, समीर शाह यांनी अथक प्रयत्नातून ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. डॉ. वडेयार म्हणाले, की ४९ वर्षांच्या गुणवंती गुंदेशा यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीत त्यांचे यकृत निकामी झाल्याचे दिसून आले. त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या शरीरावर पडत होता. त्यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. तातडीने यकृत प्रत्यारोपण करणे गरजेचे होते. त्यासाठी यकृत हवे असल्याचे डॉक्टरांनी त्यांच्या घरच्यांना सांगितले. ते ऐकताच गुंदेशा यांची धवल आणि धीरज ही दोन्ही मुले यकृत दान करण्यासाठी पुढे आली. डॉक्टरांनी तातडीने दोघांच्या तपासण्या करून कोणाचे यकृत मॅच होत आहे, हे पाहिले. यामध्ये गुंदेशा यांचा लहान मुलगा धीरज याचे यकृत मॅच होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्याने तातडीने यकृत दान करण्याचा निर्णय घेतला. लगेचच डॉक्टरांनी शस्त्रक्रिया सुरू केल्या. तब्बल १२ तास शस्त्रक्रिया करून धीरजचे अर्धे यकृत काढले आणि गुंदेशा यांचे खराब झालेले यकृत काढून त्याठिकाणी धीरजच्या यकृताचे प्रत्यारोपण केले. गुंतागुंतीची ही शस्त्रक्रिया डॉक्टरांनी यशस्वीरीत्या पार पाडली. (प्रतिनिधी)