शेतजमिन अर्धलीन करायला घेतल्याच्या रागातून दोन भावांवर कोयत्याने वार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 23:33 IST2020-03-30T23:30:01+5:302020-03-30T23:33:58+5:30

शेतजमिन अर्धलीन करायला का घेतली म्हणून दोन भावावर कोयत्याने वार केल्याची घटना मिरजेवाडी ता खेड येथे घडली आहे. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

The two brother strapped due to work with another person ; incident near Rajgurunagar | शेतजमिन अर्धलीन करायला घेतल्याच्या रागातून दोन भावांवर कोयत्याने वार  

शेतजमिन अर्धलीन करायला घेतल्याच्या रागातून दोन भावांवर कोयत्याने वार  

राजगुरुनगर: शेतजमिन अर्धलीन करायला का घेतली म्हणून दोन भावावर कोयत्याने वार केल्याची घटना मिरजेवाडी ता खेड येथे घडली आहे. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

मच्छिंद्र किसन मांजरे (वय३५ ), किसन लक्ष्मण मांजरे (वय ६० ) रा  मिरजेवाडी, चास (ता खेड ) असे गंभीर जखमी झालेल्याची नांवे आहेत याबाबत सविस्तर माहिती अशी की, मिरजेवाडी, चास येथे गोविंद भिकाजी जाधव याचे घरासमोरच्या रस्त्यावरुन जात असताना गोविंद भिकाजी जाधव व  मच्छिंद्र किसन मांजरे यांना हरिभाऊ भिकाजी जाधव याची शेत जमिन अर्धलीने करायला का घेतली , असे म्हणुन मी तुला खल्लास करतो, असे म्हणुन त्या कारणावरून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने जाधव यांने त्याच्या हातातील कोयत्याने मच्छिंद्र याचे मानेवर जोराचा वार केला .दरम्यान किसन लक्ष्मण मांजरे हे भांडणे सोडविण्यास गेले असता त्यांनाही हातातील कोयत्याने जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात, छातीवर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले आहे

याबाबत भुषण किसन मांजरे (वय ३० ) ( रा मिरजेवाडी, चास, ता खेड ) यांने खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गंभीर जखमी झालेले दोन भाऊ चाकण येथे एका खाजगी रुग्नालयात उपचार घेत आहेत त्यामध्ये एकाची प्रकृती चिंताजनक आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक अरविंद चौधरी करित आहे

Web Title: The two brother strapped due to work with another person ; incident near Rajgurunagar