पुणे : एमडी ड्रग्जची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना वाघोली पोलिसांनी पकडून त्यांच्याकडून एकूण ३१ लाख ६ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. योगेश सुभाष कणगरे (वय ३८, रा. शिवकृपा बिल्डिंग, साईनगर, लोहगाव) आणि सोनू सिंह ऊर्फ मनुवेंद्र ऊर्फ सोनू शंकर सिंह (वय ४२, रा. विद्यानगर, गुड विल रेसिडेन्सी, टिंगरेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
वाघोली पोलिस ठाण्याचे तपास पथक सातव वस्ती रोडवर पेट्रोलिंग करत असताना पोलिस अंमलदार प्रदीप मोटे, विशाल गायकवाड यांना पाहून एक जण घाईगडबडीत निघून जाण्याच्या प्रयत्नात होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन योगेश कणगरे याची झडती घेतली, तेव्हा त्याच्याकडे १ लाख ८ हजार रुपयांचे ५ ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) मिळून आले. पोलिसांनी त्याच्या कारसह एमडी जप्त करून योगेश कणगरे याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये त्याने एमडी पावडर ही त्याचा मित्र सोनू सिंह याने दिल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन सोनू सिंह याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १ लाख ४७ हजार रुपयांची ८ ग्रॅम एमडी पावडर, दुचाकी आणि मोबाइल मिळून आला. तपासादरम्यान पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली. त्यात घराच्या पार्किंगमध्ये एक कार होती. या कारची झडती घेतली, तेव्हा कारमध्ये ४ लाख ६४ हजार रुपयांचे २३ ग्रॅम एमडी मिळून आले. पोलिसांनी ती २० लाखांची कारदेखील जप्त केली. या दोन कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण ३७ ग्रॅम एमडी, मोबाइल, दोन कार आणि दुचाकी असा ३१ लाख ६ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
ही कारवाई अपर पोलिस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलिस निरीक्षक पल्लवी मेहेर, एपीआय विनायक अहिरे, उपनिरीक्षक मनोज बागल, राहुल कोळपे, पोलिस अंमलदार बाबासाहेब मोराळे, प्रदीप मोटे, मंगेश जाधव, सुनील कुसाळकर, समीर भोरडे, पांडुरंग माने, विशाल गायकवाड, दीपक कोकरे, साईनाथ रोकडे, प्रीतम वाघ, शिवाजी चव्हाण, मारुती वाघमारे, अशोक शेळके, अमोल सरतापे, गहिनाथ बोयणे आणि अमोल ढोणे यांच्या पथकाने केली.
Web Summary : Pune police arrested two individuals in Wagholi for selling MD drugs, seizing ₹31.06 lakh worth of contraband, including MD powder, cars, and a motorcycle. The accused are Yogesh Kanagare and Sonu Singh.
Web Summary : पुणे पुलिस ने वाघोली में एमडी ड्रग्स बेचने के आरोप में दो लोगों को गिरफ्तार किया, और एमडी पाउडर, कारों और एक मोटरसाइकिल सहित ₹31.06 लाख का माल जब्त किया। आरोपी योगेश कनगर और सोनू सिंह हैं।