शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या काहिलीने टोमॅटोची रोपे कोलमडली

By admin | Updated: March 29, 2017 00:22 IST

चालू वर्षी असणाऱ्या तीव्र उन्हाळ्याची झळ माणसांना तर बसत आहेच, पण टोमॅटोच्या नवीन लागवडी केलेल्या नवीन

खोडद : चालू वर्षी असणाऱ्या तीव्र उन्हाळ्याची झळ माणसांना तर बसत आहेच, पण टोमॅटोच्या नवीन लागवडी केलेल्या नवीन रोपांवरदेखील दुष्परिणाम होत आहे. शेतात लागवड केलेली रोपे सुकू लागली आहेत. ती वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. जुन्नर तालुक्यात सध्या उन्हाळी हंगामातील टोमॅटो पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चालू वर्षी टोमॅटोला बाजारभाव चांगले मिळतील, या आशेने टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले आहे. इतर कोणत्याही शेतीमालाला खात्रीशीर बाजारभाव राहिला नसल्याने आर्थिक चलन फिरविण्यासाठी टोमॅटोच्या पिकाशिवाय पर्याय नाही, असा विचार करून अनेक छोट्या-मोठ्या शेतकऱ्यांनी टोमॅटो लागवडीकडे लक्ष केंद्रित केले आहे.टोमॅटोपिकासाठी मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन संच बसवून शेतकरी टोमॅटोची लागवड करीत आहेत. वाढत्या उन्हामुळे या नवीन रोपांना उष्णतेच्या तीव्र झळा लागल्यामुळे रोपे कोलमडून जाऊन सुकू लागली आहेत.नर्सरीमधून थेट शेतात लागवडीसाठी आणलेली टोमॅटोची रोपे वाढत्या उष्णतेला तग धरून राहू शकत नाहीत. सध्याच्या वाढत्या तापमानामुळे टोमॅटोची रोपे सुकून मर वाढण्याची शक्यता असते.‘वाढत्या उष्णतेने टोमॅटो रोपांचा बाष्पोच्छर्जनाचा वेग वाढतो आणि रोपे कोलमडतात, यामुळे रोपांची लागवड शक्यतो संध्याकाळी करावी. दोन दिवस अगोदर बेड चांगले भिजवून घ्यावेत. त्यामुळे मातीतील उष्णता निघून जाते. मल्चिंग पेपरला छिद्र पाडल्यानंतर लगेच लागवड करू नये. १ दिवस मल्चिंग पेपरमधील उष्णता हवेत निघून जाऊन द्यावी. त्यामुळे रोपांची होणारी मरतुक कमी होते.’ असे कृषी तंत्रनिकेतन केंद्राचे प्राचार्य प्रा. राधाकृष्ण गायकवाड यांनी सांगितले.(वार्ताहर)रोपे वाचविण्यासाठी काय करता येईल? शक्य असेल तर आय. व्ही. क्रॉप कव्हरच वापर करावा. त्यामुळे पिकांचा तीव्र सूर्यप्रकाशापासून बचाव होतो. शेताच्या चहू बाजूंनी मका, हत्ती गवताची लागवड करावी.  हिरव्या शेडनेटचा वापर करावा. त्यामुळे पिकाला उष्णतेचा जास्त त्रास होत नाही. रोपे लागवडीपूर्वी व्यवस्थित हार्डनिंग केलेली असावीत. शेडनेटमधून आणून थेट शेतात लागवड करू नये. त्यामुळे रोपांची मर वाढते.