शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
3
Latest Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
5
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
6
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
7
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
8
मोबाईल फक्त निमित्त! तुमची ऊर्जा गुपचूप चोरणाऱ्या 'या' छुप्या गोष्टी तुम्हाला माहितीय का?
9
दोन दिवसांवर आलेल्या लग्नासाठी घेतलेल्या ३० साड्या, ६० हजार खाक; ४ तोळे सोने गायब
10
बीड कारागृहात राजकीय ड्रामा! वाल्मीक कराड गँगकडून मारहाणीचा आरोप अन् 'त्या' कैद्याचा 'यू-टर्न'
11
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
12
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
13
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
14
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
15
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
16
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
17
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
18
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
19
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
20
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार फुटांचा सुळका केला सर!

By admin | Updated: March 23, 2017 04:06 IST

तीन हजार फूट उंचीचा लिंगाणा किल्ला (सुळका) सर करण्याची किमया येथील चार युवकांनी करून दाखवली आहे. किल्ला सर

शिरूर : तीन हजार फूट उंचीचा लिंगाणा किल्ला (सुळका) सर करण्याची किमया येथील चार युवकांनी करून दाखवली आहे. किल्ला सर करण्याची मनात भीती होती. मात्र काहीही झाले तरी किल्ला सर करण्याचा मनी निश्चयच केला. त्यामुळे यशस्वी झालो, अशी प्रतिक्रिया यापैकी कुणाल काळे या युवकाने दिली.रायगड, तोरणा व राजगड या तीन किल्ल्यांनी वेढा घातलेला किल्ला म्हणजे लिंगाणा किल्ला. आभाळात घुसू पाहणारा हा सुळका पाहताच मनात धडकी भरल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे हा सुळका सर करायचे धाडस फारसे कोणी करत नाही. तरीही अनेकांनी हा किल्ला सर केला आहे. कुणाल काळे, भूषण खैरे, अलोक वारे व योगेश फाळके या येथील चार युवकांना ट्रेकिंगची आवड आहे. यामुळे ते दर दोन महिन्याला राज्यातील वेगवेगळ्या किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी जातात. छोटे-मोठे किल्ले त्यांनी सर केले. यातून अनेक नवे मित्र बनत गेले. फेसबुकवर अशा मित्रांचा ग्रुप तयार झाला. फेसबुकवरच पुणे येथील गडसंवर्धनाची कामे करणाऱ्या ‘सह्याद्री प्रतिष्ठान’ची माहिती या युवकांना मिळाली. यातूनच प्रतिष्ठानचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे, अध्यक्ष गणेश खुटवड यांची भेट झाली. यानंतर या प्रतिष्ठानच्या माध्यमातून लिंगाणा सर करण्याच्या मोहिमेत या चौघांनी सहभाग घेतला.मोठा किल्ला सर करण्याचा अनुभव नव्हता. मात्र मनात निर्धार केला. लिंगाण्याच्या रौद्ररूपाची कल्पना होती. प्रत्यक्षात मोहिमेवर निघालो असता, मनात आमच्या भीती होती. मात्र सुरुवात केली, असे कुणालने सांगितले. प्रथम सर्व जण सिंगापूर गावात जमले. दीड तासात बोराटाची नाळ पार केली. पायथ्याला पोहोचले. तेथून किल्ला चढाईला सुरुवात केली. संध्याकाळी डोंगराच्या कुशीत असलेल्या गुहेत त्यांनी रात्र काढली. दुसऱ्या दिवशी पहाटे पाचला पुन्हा डोंगर चढाई सुरू करण्यात आली. खडतर चढाई करत अखेर ध्येयपूर्ती केली. पहिलाच अनुभव असल्याने प्रत्येक जणाने थरारक अनुभव घेतला. अवघड व जीवावर बेतू शकणारी मोहीम फत्ते केल्याचे समाधान असल्याचे कुणालने सांगितले. (वार्ताहर)