शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

विरोध केल्याने मोबाईल चोरट्याने पाडले तीन दात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 16:17 IST

फिर्यादी हे पर्वती टेकडीवर कार्तिकस्वामी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या जंगलातील भिंतीवर बसले होते.

ठळक मुद्देपर्वती टेकडीवरील घटना

पुणे : मोबाईल चोरी करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला विरोध केल्याने तरुणाला तीन दात गमविण्याची पाळी आली़. ही घटना पर्वती टेकडीवरील कार्तिकस्वामी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर सोमवारी दुपारी चार वाजता घडला.याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी चोरट्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जनता वसाहतीत राहणाऱ्या ३५ वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे पर्वती टेकडीवर कार्तिकस्वामी मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असलेल्या जंगलातील भिंतीवर बसले होते.त्यावेळी एक चोरटा त्यांच्याजवळ आला. त्याने फिर्यादी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला विरोध केल्याने चोरट्याने त्यांच्या हनुवटीवर चाकूने वार केला. त्यानंतर त्यांना खाली पाडून जीवे मारण्याच्या इराद्याने चाकूने त्यांच्या पाठीमागील बाजूला, तोंडावर मारुन जखमी केले. त्यांच्या तोंडावर फाईट मारली. त्यात त्यांचे वरच्या बाजूचे तीन दात पडले. त्यानंतर त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात त्यांच्या डाव्या हाताचे मनगट व डाव्या पायाचे खुब्याला फॅक्चर झाले. चोरट्याने त्यांच्याकडील मोबाईल व खिशातील २०० रुपये असा ७ हजार २०० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरुन नेला. दत्तवाडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हे कपड्याच्या दुकानात कामाला आहे़ ते फिरायला गेले होते. त्यांच्या पायाच्या खुब्याला फॅक्चर झाले असून सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. त्या भागात सीसीटीव्ही नाहीत. फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनावरुन पोलीस उपनिरीक्षक के. डी. संकपाळ अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरी