शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये तीन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2020 11:08 IST

किराणा दुकानांना व होम डिलिव्हरी भाजीपाला फक्त दोन तास उघडे ठेवण्याची मुभा.

ठळक मुद्देअत्यंत निकडीच्या गोष्टी व अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी प्रशासन तत्परप्रशासनाला सर्व नागरिकांची मदत आणि सहकार्य आवश्यक

कळस : बारामतीमध्ये कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढल्याने वालचंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये तीन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली. तहसिलदार, ग्रामपंचायत व पोलिस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या संपुर्ण लॉकडाऊन कालावधीत दवाखाने व मेडिकल वगळता कोणत्याही स्वरूपाची दुकाने चालु राहणार नाहीत. किराणा दुकानांना व होम डिलिव्हरी भाजीपाला फक्त दोन तास उघडे ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर पडण्यास परवानगी देण्यात आली नाही. या कालावधीत नागरिकांनी घरातच थांबुन प्रशासनला सहकार्य करायचे आहे. शेजारील बारामतीमध्ये रुग्ण वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत तालुक्यामध्ये कोरोनाला प्रवेश करू द्यायचा नाही असा निर्धार करण्यात आला आहे.   प्रशासनाला सर्व नागरिकांची मदत आणि सहकार्य आवश्यक आहे. आपण प्रशासनाला साथ द्यावी आणि घराबाहेर पडू नये. वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आपल्या अत्यंत निकडीच्या गोष्टी व अत्यावश्यक सेवा पुरवण्यासाठी प्रशासन तत्पर असून कोणतीही अडचण येऊ देणार नाही, असे पवार यांनी सांगितले.

टॅग्स :IndapurइंदापूरMIDCएमआयडीसीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbusinessव्यवसायPoliceपोलिस