शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

२० दिवसापूर्वीच थार घेतलेली, कोकणात फिरण्यासाठी निघाले होते, चौघांचा मृतदेह सापडला, दोनजण बेपत्ता; ओळख पटली, नाव आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 17:56 IST

हे तरुण पुण्यातील कोंढवे, धावडे आणि कोपरे गावातील आहेत.  सहा मित्र १७ नोव्हेंबरच्या रात्री घरातून उत्साहाने निघाले होते. मात्र काही तासांतच त्यांच्या आयुष्याचा शेवट ताम्हिणी घाटातील खोल दरीत झाला. 

ताम्हिणी घाटातील धोकादायक वळणावर थार गाडीचा अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. अपघात होऊन तीन दिवस उलटले आहेत, तीन दिवसानंतर अपघात झाल्याचे समोर आले. पोलिसांनी आणि बचाव पथकांनी सकाळपासून शोधमोहिम सुरू केली होती. थारमधून सहा जण प्रवास करत होते. यामधील चौघांचे मृतदेह सापडले आहेत. शोधमोहिम अजूनही सुरूच आहे.

हे तरुण पुण्यातील कोंढवे, धावडे आणि कोपरे गावातील आहेत.  सहा मित्र १७ नोव्हेंबरच्या रात्री घरातून उत्साहाने निघाले होते. मात्र काही तासांतच त्यांच्या आयुष्याचा शेवट ताम्हिणी घाटातील खोल दरीत झाला. 

ताम्हिणी घाटाचा पोलिसांना संशय आला

मिळालेल्या माहितीनुसार, १७ नोव्हेंबरच्या रात्री ११.३० वाजता पुण्याहून निघालेल्या या तरुणांचा वाटेतच कुटुंबीयांशी संपर्क तुटला. सतत संपर्क न झाल्यानंतर कुटुंबीयांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी लगेच कारवाई करत सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे तपास सुरू केला.  यावेळी पोलिसांना ताम्हिणी घाटाचा संशय आला. पोलिसांना लगेच तपास वाढवला. 

पोलिसांनी मोबाईलचे लोकेशन पाहून ताम्हिणी घाटातील धोक्याच्या वळणांचा शोध घेतला. पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने शोध घेतला. यावेळी पोलिसांना खोल दरीमध्ये थार गाडी आणि मृतदेह दिसून आले, यानंतर पोलिसांनी लगेच चक्रे फिरवत मदत मोहिम सुरू केली. खोल दरीतून मृतदेह काढण्यासाठी सगळी व्यवस्था लावण्यात आली. 

चार जणांचा मृतदेह सापडला

पोलिसांनी ताम्हिणी घाटातील दरीमध्ये ड्रोन सोडला. यावेळी पोलिसांना एक थार गाडी आणि चार जणांचे मृतदेह सापडले.  दरी उभी आणि दगडी असल्यामुळे बचावकार्य कठीण झाले. मृतांमध्ये शहाजी चव्हाण (२२), पुनित सुधारक शेट्टी (२०), साहिल बोटे (२४) आणि महादेव कोळी (१८) यांचा समावेश आहे. तर ओंकार कोळी (१८) आणि शिवा माने (१९) हे दोन मित्र अजूनही सापडलेले नाहीत. अद्यापही शोधमोहीम सुरू आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Thar Crashes in Tamhini Ghat: Four Dead, Two Still Missing

Web Summary : A Thar crashed in Tamhini Ghat, Pune. Four bodies recovered; two missing. The group of six friends were traveling to Kokan. Police are investigating.
टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात