आयुषच्या खुनाचा कट आखल्याची माहिती होती; नगरसेविका लक्ष्मी आंदेकरचा जामीन फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 09:51 IST2026-04-21T09:48:52+5:302026-04-21T09:51:19+5:30

लक्ष्मी हिस जामीन मंजूर झाल्यास ती साक्षीदारांना आर्थिक प्रलोभन दाखवून तसेच माहिती देण्यापासून परावृत्त करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे

There was information that Ayush was planning to murder him Corporator Lakshmi Andekar's bail rejected | आयुषच्या खुनाचा कट आखल्याची माहिती होती; नगरसेविका लक्ष्मी आंदेकरचा जामीन फेटाळला

आयुषच्या खुनाचा कट आखल्याची माहिती होती; नगरसेविका लक्ष्मी आंदेकरचा जामीन फेटाळला

पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खूनप्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयूष गणेश कोमकर याच्यावर गोळीबार करून निर्घृण खून केल्याप्रकरणात टोळीप्रमुख बंडू यासह त्याच्या सहकाऱ्यांनी आयुषच्या खुनाचा कट आखल्याची माहिती आरोपी लक्ष्मी आंदेकरला होती. गोपनीय साक्षीदाराने पोलिसांकडे दिलेल्या माहितीवरून तिचा सहभाग निष्पन्न होत असल्याची माहिती पोलिसांनीन्यायालयाला दिली. त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. कंठाळे यांच्या न्यायालयाने मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आरोपी नगरसेविका लक्ष्मी आंदेकर हिचा जामीन अर्ज फेटाळला.

न्यायालयीन कोठडी सुनावल्याने येरवडा कारागृहात असलेल्या लक्ष्मी हिने जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज केला. त्यास सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला. लक्ष्मी हिने केलेला गुन्हा हा अतिसंवेदनशील असून, दोन गुन्हेगारी टोळीतील पूर्ववैमनस्य तसेच पुतण्या वनराज याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी घडवून आणला आहे. लक्ष्मी ही गुन्हेगारी टोळीची सक्रिय सदस्य आहे. साक्षीदारांच्या चौकशी तसेच जबाबातून तिचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला आहे. गुन्हा घडण्यापूर्वी तसेच त्यानंतर ती अन्य आरोपींच्या संपर्कात होती हे तांत्रिक विश्लेषणावरून स्पष्ट झाले आहे. ती नऊ दिवस फरार होती. त्यानंतर तिला गुजरात येथील द्वारका येथून ताब्यात घेण्यात आले.

लक्ष्मी हिस जामीन मंजूर झाल्यास ती साक्षीदारांना आर्थिक प्रलोभन दाखवून तसेच माहिती देण्यापासून परावृत्त करण्याची दाट शक्यता आहे. तसेच ती नगरसेविका असल्याने तिला जामीन मंजूर झाल्यास या भागातील बेकायदेशीर जमाव जमवून प्रभागात उभारलेले अनधिकृत बांधकाम कारवाईवर अडथळा आणण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिचा जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. कावेडिया यांनी केला. न्यायालायने तो ग्राह्य धरत जामीन फेटाळला. बंडू आंदेकर तसेच सोमनाथ गायकवाड यांच्या टोळीयुद्धातून वनराज आंदेकर याचा गेल्यावर्षी गोळ्या झाडून व कोयत्याने वार करून खून झाला होता. या खुनाचा बदला म्हणून गणेश कोमकरचा मुलगा आयुषचा गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गोळ्या झाडून खून करण्यात आला होता, असे पोलिस तपासातून पुढे आले आहे.

Web Title : आयुष हत्याकांड की साजिश में पार्षद लक्ष्मी आंदेकर की जमानत खारिज।

Web Summary : लक्ष्मी आंदेकर को आयुष कोमकर की हत्या की साजिश की जानकारी थी। पुलिस ने अपराध से उनके संबंध का खुलासा करने के बाद, शामिल होने और गवाहों से छेड़छाड़ की आशंका के कारण उनकी जमानत खारिज कर दी गई।

Web Title : Corporator Lakshmi Andekar's bail rejected in Ayush murder conspiracy case.

Web Summary : Lakshmi Andekar knew of the Ayush Komkar murder plot. Her bail was rejected due to involvement and witness tampering concerns, after police revealed her connection to the crime.