दहावीत झाला वाद; बारावीत घेतला सूड, परीक्षा देऊन बाहेर आलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 17:21 IST2026-02-25T17:20:11+5:302026-02-25T17:21:00+5:30

हल्ल्यात जखमी झालेला १८ वर्षीय विद्यार्थी आणि अल्पवयीन आरोपी हे वारजे भागातील एका शाळेत शिक्षण घेत होते. दहावीत असताना त्यांच्यात वाद झाला होता

There was an argument in 10th grade; revenge was taken in 12th grade, a student who had passed the exam was attacked by a coyote; Shocking incident in Pune | दहावीत झाला वाद; बारावीत घेतला सूड, परीक्षा देऊन बाहेर आलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; पुण्यातील धक्कादायक घटना

दहावीत झाला वाद; बारावीत घेतला सूड, परीक्षा देऊन बाहेर आलेल्या विद्यार्थ्यावर कोयत्याने वार; पुण्यातील धक्कादायक घटना

पुणे : बारावीची परीक्षा देऊन बाहेर पडलेल्या एका विद्यार्थ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना कोथरूडमधील एका महाविद्यालयाच्या परिसरात मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी कोथरूडपोलिसांनी तीन अल्पवयीनांना ताब्यात घेतले आहे.

हल्ल्यात जखमी झालेला १८ वर्षीय विद्यार्थी आणि अल्पवयीन आरोपी हे वारजे भागातील एका शाळेत शिक्षण घेत होते. दहावीत असताना त्यांच्यात वाद झाला होता. जखमी विद्यार्थी मंगळवारी दुपारी कोथरूड भागातील एका महाविद्यालयात बारावीची परीक्षा देण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याला आरोपींनी गाठले आणि शिवीगाळ करून त्याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत तो किरकोळ जखमी झाला, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून कोयता जप्त केला आहे.

Web Title : पुणे: परीक्षा के बाद छात्र पर हमला; बदला बना कारण।

Web Summary : पुणे में 12वीं की परीक्षा के बाद एक 18 वर्षीय छात्र पर दरांती से हमला किया गया। हमला दसवीं कक्षा के दौरान हुए विवाद का परिणाम था। पुलिस ने हमले के संबंध में तीन नाबालिगों को गिरफ्तार किया है, हथियार बरामद।

Web Title : Pune: Student attacked with sickle after exam; revenge motive.

Web Summary : An 18-year-old student was attacked with a sickle in Pune after his 12th-grade exam. The attack stemmed from a prior dispute during tenth grade. Police have apprehended three minors in connection with the assault, recovering the weapon.