जेलमधून सुटल्यानंतर मिरवणुकीचा थाट, पण पोलिसांनीच काढली,'वरात'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 11:07 IST2025-02-12T11:06:47+5:302025-02-12T11:07:38+5:30
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कठोर पावलं उचलली

जेलमधून सुटल्यानंतर मिरवणुकीचा थाट, पण पोलिसांनीच काढली,'वरात'
- किरण शिंदे
पुणे : जेलमधून बाहेर आल्यानंतर रॅली काढणाऱ्या गुड्ड्या कसबेची पोलिसांनीच वरात काढली आहे. जानेवारी महिन्यात येरवडा परिसरात गुड्ड्या कसबे आणि त्याच्या ५०-६० साथीदारांनी दुचाकी रॅली काढून नागरिकांना त्रास दिला. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कठोर पावलं उचलली.
पुणे पोलिसांचा आता शहरात "धिंड" पॅटर्न!
— Lokmat (@lokmat) February 12, 2025
जेलमधून सुटल्यानंतर आरोपीने काढली रॅली, आता पोलिसांनी तिथेच काढली त्याची वरात.#punepic.twitter.com/mks22x4rjj
'धिंड पॅटर्न'म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नव्या शैलीत, पोलिसांनी या आरोपींची त्याच भागात रोड परेड काढली. या अनोख्या कारवाईमुळे गुन्हेगारीला आळा घालण्याचा पोलिसांचा प्रयत्न दिसून आला आहे. घटनास्थळाची तपासणी आणि इतर आरोपींचा शोध सुरू असून पुणे पोलिसांच्या या कठोर भूमिकेचे कौतुक होत आहे. 'रॅली काढली, वरात मिळाली!'अशा प्रतिक्रियांमुळे ही घटना चर्चेचा विषय बनली आहे.