National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 11:36 IST2025-12-16T11:34:16+5:302025-12-16T11:36:51+5:30

नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह एकूण सात जणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Relief to Sonia, Rahul Gandhi in National Herald case as Delhi Court dismisses ED complaint | National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा

नॅशनल हेराल्ड मनी लाँडरिंग प्रकरणात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास न्यायालयाने स्पष्टपणे नकार दिला . या निर्णयामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासह एकूण सात जणांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाच्या पुढील तपासावर आणि न्यायालयीन घडामोडींवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

 राऊस ॲव्हेन्यू न्यायालयाने ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेण्यास नकार दिला असला तरी, ईडीला या प्रकरणाचा तपास सुरू ठेवण्यास मात्र परवानगी दिली आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, ईडीने दाखल केलेला हा खटला एफआयआरवर आधारित नसून, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी दाखल केलेल्या खासगी तक्रारीवर आणि दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या समन्स आदेशांवर आधारित आहे.

ईडीने त्यांच्या आरोपपत्रात सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्याव्यतिरिक्त सॅम पित्रोदा, सुमन दुबे, सुनील भंडारी, यंग इंडियन आणि डोटेक्स मर्चंडाइज प्रायव्हेट लिमिटेड यांची नावे आरोपी म्हणून समाविष्ट केली. दरम्यान, काँग्रेस पक्षाने ही ईडी चौकशी केवळ राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप केला होता. परंतु, ईडीने  हे एक गंभीर आर्थिक गुन्हा प्रकरण आहे, ज्यामध्ये फसवणूक आणि मनी लाँडरिंगचे ठोस पुरावे आढळले, असा दावा केला.

ईडीचा मुख्य आरोप आहे की, काँग्रेस नेत्यांनी यंग इंडियन या कंपनीमार्फत केवळ ₹५० लाखांमध्ये असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडची २,००० कोटींहून अधिक किंमतीची मालमत्ता खरेदी करण्याचा कट रचला. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे यंग इंडियन कंपनीचे ७६ टक्के शेअर्स आहेत. या प्रकरणात गुन्ह्यातून मिळालेले उत्पन्न ९८८ कोटी इतके होते, तर संबंधित मालमत्तेचे बाजार मूल्य सुमारे ५,००० कोटी इतके असल्याचा ईडीचा दावा आहे.

Web Title : नेशनल हेराल्ड मामला: सोनिया और राहुल गांधी को बड़ी राहत।

Web Summary : नेशनल हेराल्ड मामले में सोनिया और राहुल गांधी को राहत मिली क्योंकि अदालत ने ईडी के आरोप पत्र को स्वीकार करने से इनकार कर दिया, लेकिन आगे की जांच की अनुमति दी। आरोपों में यंग इंडियन के माध्यम से संपत्ति का अधिग्रहण शामिल है। कांग्रेस इसे राजनीतिक प्रतिशोध कहती है, जबकि ईडी मनी लॉन्ड्रिंग का दावा करती है।

Web Title : National Herald Case: Sonia and Rahul Gandhi receive major relief.

Web Summary : Sonia and Rahul Gandhi got relief in the National Herald case as the court refused to acknowledge the ED's charge sheet but allowed further investigation. Allegations involve property acquisition via Young Indian. The Congress calls it political vendetta, while the ED claims money laundering.