शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

तमाशाच्या राहुटीला अनुदानाचेही नाही ठिगळ

By admin | Updated: July 3, 2014 05:56 IST

लोकसंस्कृती टिकविण्यासाठी लोककलांना राज्य शासनाकडून अनुदान देण्यास सुरुवात झाली आहे.

धनश्री भावसार-बगाडे, पुणेलोकसंस्कृती टिकविण्यासाठी लोककलांना राज्य शासनाकडून अनुदान देण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील करमणुकीचे साधन असलेल्या आणि अस्सल मराठी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या तमाशाच्या राहुटीला मात्र अनुदानाचे ठिगळही मिळेनासे झाले आहे. तब्बल सहा वर्षांपासून तमाशा फडांना अनुदान मिळालेले नाही. राज्य शासनाच्या १ जानेवारी २००८ च्या अध्यादेशानुसार लोककलेच्या जतन व विकासासाठी भांडवली व प्रायोगिक अनुदान योजना सुरू करण्यात आली आहे. ही घोषणा झाल्यावर लोककलावंतांनी आनंद व्यक्त केला होता. त्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तताही करण्यात आली होती. मात्र, आदेश निघाल्यानंतरही अर्जांची तपासणी करण्यासाठी समिती नेमण्यासाठीच चार वर्षे लागली. त्यातही समितीला संबंधित लोककलेची चाचणी घेण्यासाठी वेळ मिळेना. तमाशाच्या संगीतबारींची चाचणी नुकतीच झाली. आता ही समिती आपला अहवाल सादर करणार, त्यावर मंत्रालय पातळीवर निर्णय होऊन सगळे प्रशासकीय सोपस्कार होऊन मग कलावंतांना अनुदान मिळणार आहे. तमाशा फडमालक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर म्हणाले, ‘‘तमाशा फडांना गेली ६ वर्षे हे अनुदान मिळालेले नाही. परंतु, यंदा देणार असल्याचे आश्वासन शासनाने आम्हाला दिले असून, ३० आॅगस्टच्या अगोदर अनुदान मिळणार असल्याचे सांगितले आहे. त्याच्यासाठी चाचणी आता झाली. त्यामुळे अनुदान कधी मिळणार, हा प्रश्नच आहे.’’राज्याच्या सांस्कृतिक संचलनालयाचे सहसंचालक मनोज सानप म्हणाले, ‘‘अनुदानासाठी यंदा १४ संगीतबारी, ४ शाहीर व २३ खडीगंमतचे अर्ज आले होते. त्यापैकी खडीगंमतची चाचणी वर्षभरापूर्वी नागपूर येथे झाली असून, संगीतबारीची पुण्यात नुकतीच चाचणी झाली. यापैकी एक संगीतबारी अनुपस्थित असून, ३ संगीतबारींचे सादरीकरण शासनास न आवडल्याने त्यांना सुधारण्याची संधी देत या चार संगीतबारींची पुन्हा एकदा चाचणी घेण्यात येणार आहे.’’सांस्कृतिक संचालनालयाचे अधीक्षक नीलेश धुमाळ म्हणाले, ‘‘ भांडवली अनुदान पूर्णवेळ तमाशाला २ लाख रुपये, हंगामी तमाशाला १ लाख रुपये, खडीगंमत व शाहिरीला ५० हजार रुपये, तर संगीतबारीला २५ हजार रुपयांचे देण्यात येते.’’