शहरं
Join us  
Trending Stories
1
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
2
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
5
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
6
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
7
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
9
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
10
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
11
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
12
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
13
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
14
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
15
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
16
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
17
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
18
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
19
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
20
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
Daily Top 2Weekly Top 5

...तर पुणे,मुंबईसह राज्यातील इतर महापालिका निवडणुका ठरलेल्या वेळेतच होणार; मंत्री अनिल परब यांचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 16:45 IST

राज्यातील महापालिका निवडणुका महाविकास आघाडी सरकार एकत्र लढणार की वेगवेगळ्या हे तिन्ही पक्षातील वरिष्ठ ठरवतील..

ठळक मुद्देराज्य परिवहन महामंडळ नवीन ७०० बस घेणार

पुणे : राज्यातील महापालिका निवडणुका महाविकास आघाडी सरकार एकत्र लढणार की वेगवेगळ्या हे तिन्ही पक्षातील वरिष्ठ ठरवतील. मात्र, कोरोना नियंत्रणात राहिल्यास महापालिकांच्या निवडणुका नियोजित वेळेतच होतील, असे स्पष्ट संकेत राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी शुक्रवारी पुण्यात दिले.

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सुरू असलेल्या विविध कामांच्या पाहणी दौऱ्यावर अनिल परब पुण्यात आले होते. त्यानंतर अनौपचारिक कार्यक्रमात पत्रकारांशी ते बोलत होते. ते म्हणाले, राज्यातील कोरोना प्रदूर्भाव कमी होत आहे. त्यामुळे परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी वावरताना नियमांचे पालन करावे. कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यास उद्योग, व्यावसाय, दळणवळण पूर्ण क्षमतेने सुरू होऊन राज्य प्रगतीपथावर येण्यास हातभार लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी नियमांचे पालन करावे. -------सरकार मराठा आरक्षणाचा बाजूने

खासदार संभाजीराजे आणि मराठा समाजातील विविध संघटना यांच्याबरोबर सरकार सातत्याने संवाद साधत आहे. मराठा आरक्षणाच्या बाजूने सरकार आणि शिवसेनेची देखील सकारात्मक भूमिका आहे. त्याचबरोबर इतर सर्व समाजच्या न्याय, हक्काच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. -------एसटी डेपोवरील पेट्रोल पंप खुले करणार

एसटी महामंडळाचा आर्थिक स्त्रोत बळकट करण्यासाठी राज्यातील सर्व डेपोवरील पेट्रोल पंप सर्वांसाठी खुले करण्याचे नियोजन आहे. सध्या या डेपोवर फक्त महामंडळाच्या बसमध्ये पेट्रोल, डिझेल भरले जात आहे. त्यामुळे शासनाच्या विविध विभाग, खात्याच्या गाड्या किंवा खासगी गाड्यांनाही या डेपोवर पेट्रोल, डिझेल भरण्याची सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने नियोजन आहे. त्यातून महामंडळाला उत्पन्नाचे एक निश्चित साधन निर्माण होणार आहे. त्यामुळे लवकरच त्याबाबत निर्णय घेऊ, असे मंत्री परब यावेळी म्हणाले. --------प्रत्येक स्टॅंडवर प्रवाशांना मूलभूत सुविधा देणार

फार हायफाय नाही, पण राज्यातील प्रत्येक एसटी स्टॅंडवर प्रवाशांना स्वच्छ पिण्याचे पाणी, प्लॅटफॉर्मवर आसन व्यवस्था आणि स्वछतागृह या मूलभूत सुविधा चांगल्या प्रकारे देण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रत्येक डेपोला सूचना केल्या असून त्यांचे काम सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेAnil Parabअनिल परबShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूकcorona virusकोरोना वायरस बातम्या