शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

स्वारगेट, शिवाजीनगर बसस्थानकांतील दूरध्वनी कायम व्यस्त अन् लागला तर कोणी उचलत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 10:27 IST

प्रवाशांनी चाैकशी करायची असेल तर कोठे करायची? यामुळे बसस्थानकातील सर्व सोयीसुविधा असल्याचा एसटी प्रशासनाचा दावा फेल ठरतोय

पुणे : स्वारगेट, शिवाजीनगर या दोन्ही बसस्थानकांतील दूरध्वनी कायम व्यस्त असतो किंवा लागला तर कोणी उचलत नाही. त्यामुळे प्रवाशांनी चाैकशी करायची असेल तर कोठे करायची? यामुळे बसस्थानकातील सर्व सोयीसुविधा असल्याचा एसटी प्रशासनाचा दावा फेल ठरत असून, तक्रार आणि चाैकशी कोणाकडे करायची, असा प्रश्न प्रवाशांना पडत आहे.

पुण्यातील स्वारगेट आणि शिवाजीनगर या दोन्ही आगारांतून राज्य आणि राज्याबाहेर जाणाऱ्या एसटींची संख्या जास्त आहे. त्यामुळे चौकशीसाठी प्रवासी वारंवार फोन करतात. पुणे विभागात एकूण १४ आगार आहेत. त्यामध्ये सर्वाधिक प्रवाशांची गर्दी असणारे स्वारगेट, शिवाजीनगर या दोन्ही आगारात असते. या दोन आगारांमधूनच दिवसाला ४० ते ५० हजार नागरिक प्रवास करतात. तसेच मुंबईदेखील प्रामुख्याने स्वारगेट आगारातून बससेवा आहे. हे दोन आगार महत्त्वाचे असून, या ठिकाणी एखादी माहिती अथवा चौकशी करण्यासाठी प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

स्वारगेट बसस्थानकात महिला अत्याचाराची घटना घडल्यानंतर एसटी महामंडळाने तत्काळ सर्व आगाराचे सुरक्षा ऑडिट केले होते. त्याठिकाणी असलेल्या सोई-सुविधा वाढविण्याच्या सूचना दिल्या. या घटनेला जबाबदार धरून काही अधिकाऱ्यांवर कारवाईदेखील. आगारातील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली. परंतु फोन न उचलल्यामुळे प्रवाशांना माहिती अथवा चौकशी करायची असेल तर बसस्थानकात गेल्याशिवाय पर्याय उरलेला नाही. याकडे कोणी लक्ष देणार की नाही, असा सवाल प्रवासी करत आहेत.

शिस्त कधी लागणार

चार महिन्यांपूर्वी स्वारगेट अत्याचार प्रकरण घडले. यानंतर अधिकाऱ्यांकडून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सेवासुविधा वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले. याबाबत एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, काम टाळण्यासाठी काही कर्मचारी जाणून-बुजून दूरध्वनीचा रिसिव्हर उचलून बाजूला ठेवतात, असे नाव न सांगण्याच्या अटीवरून  सांगण्यात आले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारpassengerप्रवासीswargate bus depotस्वारगेट बसस्थानकshivaji nagar bus depotशिवाजी नगर बसस्थानकSocialसामाजिकticketतिकिट