शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 20:50 IST

या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

Pune Rape Case ( Marathi News ) : पुण्यातील कोंढवा परिसरातील बोपदेव घाटात मित्रासोबत गेलेल्या तरुणीवर सामूहिक अत्याचाराची घटना घडली होती. याप्रकरणी तीन आरोपींपैकी एका आरोपीला यापूर्वीच अटक करण्यात आल्यानंतर आता दुसऱ्या आरोपीला पोलिसांनीउत्तर प्रदेशातील प्रयागराज येथून बेड्या ठोकल्या आहेत. तसंच या प्रकरणातील तिसरा आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटात तरुणीवर अत्याचार केल्यानंतर तीन आरोपींपैकी दोन आरोपी फरार झाले होते. पोलिसांकडून या आरोपींचा कसून शोध घेतला जात होता. अशातच आरोपींच्या मागावर पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेशात रवाना झाले होते. आज या प्रकरणातील आणखी एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं असून तिसऱ्या आरोपीचा शोध घेतला जात आहे.

पहिल्या आरोपीला उद्यापर्यंत पोलीस कोठडी

पहिल्या आरोपीला येवलेवाडी परिसरातून अटक केल्यानंतर कोंढवा पोलिसांनी त्याला शनिवारी दुपारच्या सुमारास शिवाजीनगर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले होते. "बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरणातील आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. अटक आरोपीची वैद्यकीय तपासणी करायची असून त्याचा डीएनए अहवाल प्राप्त करायचा आहे. आरोपींनी पीडितेकडे असलेली चेन चोरली असून, ती जप्त करायची आहे," असं सांगत सरकारी वकिलांनी या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. ती मान्य करत न्यायालयाने २५ वर्षीय आरोपीला  १५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. 

'त्या' रात्री बोपदेव घाटात नेमकं काय घडलं? कोंढव्यातील बोपदेव घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पीडित तरुणी मूळची सुरतमधील आहे. तिचा मित्र जळगावमधील आहे. दोघे एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. गुरुवारी (दि. ३) रात्री तरुणी आणि तिचा मित्र बोपदेव घाट परिसरात फिरायला गेले होते. रात्री ११ च्या सुमारास तरुणी आणि तिचा मित्र घाटात गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांना धमकावले. तरुणीला धमकावून तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिघे जण पसार झाले. घाबरलेल्या तरुणीला मित्राने रुग्णालयात दाखल केले. 

रुग्णालय प्रशासनाने याबाबतची प्राथमिक वैद्यकीय माहिती कोंढवा पोलिसांना दिली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी तातडीने तपास करण्याचा आदेश देण्यात आला. शुक्रवारी सकाळी याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेश