Shirur Accident: अष्टविनायक महामार्गावर टेम्पोची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू, एक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2025 13:51 IST2025-01-03T13:50:53+5:302025-01-03T13:51:55+5:30

गुरुवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान अष्टविनायक महामार्गावरून ३ जण दुचाकीवरून कवठे येमाई बाजूकडे चालले होते

Tempo hits two-wheeler on Ashtavinayak highway; two dead, one injured | Shirur Accident: अष्टविनायक महामार्गावर टेम्पोची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू, एक जखमी

Shirur Accident: अष्टविनायक महामार्गावर टेम्पोची दुचाकीला धडक; दोघांचा मृत्यू, एक जखमी

शिरूर: भरधाव माल वाहतूक टेम्पोने दुचाकीस दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू तर एक जखमी झाल्याची घटना शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातून जाणाऱ्या अष्टविनायक महामार्गावर गुरुवारी (दि.२) दुपारी घडली. या अपघातात विनोद रजकरण यादव ( ३२ ), लाला धरमपाल यादव ( २५ ) हे दोघांचा जागीच मृत्यू झाला  असून लालमल चुक्कीमल यादव ( रा. सर्व रा. शिव ता. बभेरू. जि. बांदा, उत्तर प्रदेश ) हा गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी साडेबाराच्या दरम्यान अष्टविनायक महामार्गावरून ३ जण दुचाकीवरून कवठे येमाई बाजूकडे चालले होते. तेव्हा ईचकेवाडीजवळ खार ओढ्याच्या वळणावर समोरून आलेल्या मालवाहतूक करणाऱ्या छोट्या टेम्पोने दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच टाकळी हाजी पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या अपघातातील जखमीला पुढील उपचारासाठी व मृत्यू झालेल्या दोघांना पी. एम. साठी तत्काळ शिरूर येथे हलविण्यात आले.

Web Title: Tempo hits two-wheeler on Ashtavinayak highway; two dead, one injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.