शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीकडून रेल्वे स्थानकात धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 01:32 IST

दौंड रेल्वे स्थानकात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने रेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात तीन तास धरणे आंदोलन केले. 

दौंड : दौंड रेल्वे स्थानकात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसनेरेल्वेच्या प्रलंबित प्रश्नांसंदर्भात तीन तास धरणे आंदोलन केले. या वेळी टाळ-मृदंगाच्या गजरात कीर्तन करण्यात आले. तर दुसरीकडे, गॅस दर ६० रुपयांनी वाढल्यामुळे तहसील कचेरीच्या परिसरात ३ दगडांच्या चुलीवर भाकरी भाजून केंद्र आणि राज्य शासनांचा निषेध करण्यात आला.या वेळी घोषणाबाजीने अवघा परिसर दुमदुमून गेला होता. सकाळी ६ वाजता सुप्रिया सुळे यांनी दौंड-पुणे नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर रेल्वे प्रबंधकांच्या कार्यालय परिसरात धरणे आंदोलन सुरू केले. या वेळी पक्षाच्या पुणे जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, अप्पासाहेब पवार, गुरुमुख नारंग, अ‍ॅड. अजित बलदोटा, सोहेल खान, बादशहा शेख, झुंबर गायकवाड, प्रवीण शिंदे, नागसेन धेंडे, राणी शेळके, सारिका पानसरे, योगिनी दिवेकर, वैशाली धगाटे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.या वेळी सुळे म्हणाल्या, ‘‘पुणे-दौंडदरम्यान विद्युत लोकल तातडीने सुरू झाली पाहिजे. दौंड रेल्वे स्थानक पुणे विभागाला जोडले गेले पाहिजे. कडेठाण, मांजरी येथील बंद पडलेली रेल्वेची कामे तातडीने सुरू झाली पाहिजेत. प्रभाग क्र. ५ मधील रेल्वे अधिकाºयांनी थांबविलेली कामे तातडीने सुरू झाली पाहिजेत. रेल्वे झोपडपट्टी कुठल्याही परिस्थितीत हलवू दिली जाणार नाही. रेल्वे परिसरात पाणीटंचाई आहे.‘मीटू’च्या प्रश्नावर मोदी गप्प का?सध्या राजकीय आणि सांस्कृतिक स्तरावर ‘मीटू’चा प्रश्न गाजतोय. मोदी यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्यावर २० महिला आरोप करतात. त्यात काहीतरी तथ्य असावे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘बेटी बचाव’चा नारा देतात, दुसरीकडे ‘मीटू’वर गप्प का? हा विषय राजकीय नसून सामाजिक आहे. तेव्हा संबंधित मंत्र्यांची चौकशी झाली पाहिजे. केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार हे सरकार नसून प्रॉडक्ट आहे. केवळ जाहिरातबाजीवर हे सरकार तरलेले आहे. जलयुक्त शिवाराचे श्रेय सिनेअभिनेता आमिर खान यांना दिले पाहिजे. मात्र, हे श्रेय भाजपा सरकार लाटत आहे. सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून दुष्काळावर मात करण्यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळेrailwayरेल्वे