पाटस : पाटस (ता. दौंड ) येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला अचानक लागलेल्या आगीमुळे बगॅसचे मोठे नुकसान झाले मात्र या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान एक ट्रक आगीत जळून खाक झाला आहे. नेमकी आग कशाने लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाली नाही. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कारखाना परिसरात ठेवलेल्या बगॅसला आग लागली हवेचे प्रमाण असल्यामुळे दरम्यान आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात फोफावत होते. आग लागली असल्याचे समजतात आग विझविण्यासाठी कारखान्याच्या कामगारांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील चार अग्निशामक बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दुपारनंतर आग आटोक्यात आली होती आटोक्यात आली होती. बगॅस भरण्यासाठी एक ट्रक उभा होता बगॅसला आग लागल्यानंतर आगीचे लोळ ट्रकवर आल्याने ट्रक जळून खाक झाला. घटनास्थळी पाटस पोलीस चौकीच्या पोलिसांनी परिस्थितीची पाहणी केली.
Web Summary : A sudden fire erupted at Bhima Cooperative Sugar Factory in Patas, causing significant damage to the bagasse. One truck was destroyed. The cause is unknown. Firefighters controlled the blaze after several hours, preventing further losses. No casualties reported.
Web Summary : पाटस में भीमा सहकारी चीनी मिल में अचानक आग लगने से खोई का भारी नुकसान हुआ। एक ट्रक जल गया। कारण अज्ञात है। दमकल कर्मियों ने कई घंटों बाद आग पर काबू पाया, जिससे आगे का नुकसान टल गया। कोई हताहत नहीं।