शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
3
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
4
Latest Marathi News LIVE: दाऊदचा 'खास' सलीम डोला याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
5
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
6
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
7
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
8
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
9
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
10
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
11
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
12
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
13
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
14
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
15
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
16
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
17
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
18
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
19
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
20
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
Daily Top 2Weekly Top 5

‘इलेक्ट्रिक बस’ची यशस्वी चाचणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 01:41 IST

अनेक महिन्यांपासून चर्चेत : पर्यावरणपूरक व सक्षम व्यवस्थेसाठी गरजेची

पुणे : पर्यावरणपूरक व सक्षम सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेसाठी अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेल्या ‘इलेक्ट्रिक बस’ची अखेर गुरुवारी शहरात प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात आली. पुढील सात दिवस भरलेली पोती टाकून शहराच्या सर्व भागातून, मध्यवस्ती, गर्दीच्या ठिकाणी या बसची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरच शहरात २५ इलेक्ट्रिक बस धावणार आहेत.

पुणे शहराचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी व पीएमपीच्या ताफ्यात सक्षम व चांगल्या बस आणण्यासाठी इलेक्ट्रिक बसेचा पर्याय समोर आला. अनेक महिन्यांपासून याबाबत चर्चा सुरू होत्या. अखेर गुरुवारी शहरातील सार्वजनिक वाहतुकीसाठीची पहिली इलेक्ट्रिक बस दाखल झाली. नऊ मीटर लांबीची ही ‘नॉन बीआरटी बस’ बीवायडी (ओलेक्ट्रो) कंपनीची आहे.

पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दिशेचे पाऊल म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ५०० वातानुकूलित ई-बस घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात १५० आणि दुसऱ्या टप्प्यात ३५० बस येणार आहेत. पहिल्या टप्प्यात १५० बस त्यांपैकी २५ मिडी आणि १२५ रेग्युलर बस घेणार आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रियाही राबविली. त्यामध्ये नऊ मीटर लांबीच्या बससाठी बीवायडी (इलेक्ट्रो) कंपनीची निविदा प्राप्त झाली आहे, तर १२ मीटर लांबीच्या बससाठी टाटा कंपनी व ‘बीवायडी’ कंपनीची निविदा प्राप्त झाली आहे.

महापौर मुक्ता टिळक, आयुक्त सौरभ राव, पीएमपीच्या व्यवस्थापकीय अध्यक्ष नयना गुडे, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, पीएमपीचे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. ८) टिळक रोड, स्वारगेट, बाजीराव रोड या परिसरात चाचणी घेण्यात आली.

शहराचे प्रदूषण कमी करण्यासाठी उपयोगी ठरेल
शहरात दाखल होणाऱ्या इलेक्ट्रिक बसची चाचणी गुरुवारी घेण्यात आली. बाजीराव रोड, टिळक रोड या गर्दीच्या रस्त्यांवर या बसची चाचणी घेण्यात आली. आवाजविरहित, अत्यंत स्मूथ अशी ही इलेक्ट्रिक बस आहे. सध्या देशात व जागात सर्वच ठिकाणी प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीमध्ये इलेक्ट्रिक बसची चर्चा सुरू आहे. त्यामुळे पुणे शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी या इलेक्ट्रिक बस उपयोगी ठरतील.
- मुक्ता टिळक, महापौर

२६ जानेवारीपर्यंत शहरात २५ इलेक्ट्रिक बस
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात ५०० वातानुकूलित ई-बस घेण्यात येणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात १५० बस खरेदी करण्यात येणार असून, त्यासाठीच्या निविदा जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या कंपनीकडून गुरुवारी (दि. ८) सार्वजनिक वाहतुकीतील शहरातील पहिल्या इलेक्ट्रिक बसची चाचणी घेण्यात आली. आता पुढील सात दिवस शहराच्या विविध भागात या बसची चाचणी घेण्यात येईल. त्यानंतर कर्मशील बीड ओपन करून सुरुवातील २५ इलेक्ट्रिक बसची आॅर्डर देण्यात येईल. यामुळे येत्या २६ जानेवारीपर्यंत शहरात २५ इलेक्ट्रिक बस सुरू होतील.
- सिद्धार्थ शिरोळे, संचालक पीएमपी
 

टॅग्स :PMPMLपीएमपीएमएलPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड