शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ विद्यार्थ्याची प्राणज्योत मालवली

By admin | Updated: July 7, 2016 03:29 IST

राजगुरुनगरजवळील चांडोली येथे सोमवारी स्कूल बसच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी शंभुराजे महेंद्र अरगडे (वय ९ वर्षे, रा. कडूस, ता. खेड) या विद्यार्थ्याची प्राणज्योत

राजगुरुनगर : राजगुरुनगरजवळील चांडोली येथे सोमवारी स्कूल बसच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांपैकी शंभुराजे महेंद्र अरगडे (वय ९ वर्षे, रा. कडूस, ता. खेड) या विद्यार्थ्याची प्राणज्योत अखेर बुधवारी मालवली. चिंचवड येथील रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या निधनाने आर्याज स्कूल आणि कडूस गावावर शोककळा पसरली. चांडोली येथे आर्याज स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची शाळा सुटल्यानंतर कडूसला जाणाऱ्या मुलांची बस रस्त्याच्या बाजूच्या तारेच्या कुंपणाला घासल्यामुळे हा भीषण अपघात सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास झाला होता. बसच्या धडकेने कुंपणाचा वरचा लोखंडी रॉड, बसची काच फोडून आत घुसला. तो रॉड तसाच चालकाशेजारी बसलेल्या दोन मुलांच्या छाती-पोटातून आरपार जाऊन मुले गंभीर जखमी झाली होती. त्यांना चिंचवड येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्यांच्या पोटातील रॉड काढले व पुढील उपचार सुरू केले होते. परंतु त्यापैकी शंभुराजे अरगडे याचा आज दुपारी एकच्या सुमारास मृत्यू झाला, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक मुख्तार शेख यांनी दिली.शंभुराजे इयत्ता चौथीत शिकत होता. त्याच्या मागे आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी, की ज्या बसला अपघात झाला ती बस शंभुराजेच्या वडिलांच्या म्हणजे महेंद्र अरगडे यांच्याच मालकीची आहे. अपघातग्रस्त बसचा चालक सचिन बबन बैलभरे याच्यावर भा. दं. वि. कलम ३३८ प्रमाणे दुखापतीस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्याच्यावर भा. दं. वि. कलम ३०४ (अ) प्रमाणे मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हाही दाखल केल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मुख्तार शेख यांनी दिली. (वार्ताहर)