शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
3
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
4
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
5
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
6
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
7
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
8
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
9
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
10
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
11
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
12
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
13
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
14
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
15
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
16
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
17
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
18
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
19
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
20
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

बैलगाडामालकांचा रास्ता रोको

By admin | Updated: June 5, 2016 03:38 IST

‘पेटा हटवा, बैल वाचवा’ अशा घोषणा देत शिवनेरी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य बैलगाडा चालक-मालक संघटनेच्या वतीने नारायणगाव येथे आज (दि.४) पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको

नारायणगाव : ‘पेटा हटवा, बैल वाचवा’ अशा घोषणा देत शिवनेरी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य बैलगाडा चालक-मालक संघटनेच्या वतीने नारायणगाव येथे आज (दि.४) पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ या आंदोलनामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर तालुक्यातील तसेच इतर जिल्ह्यातील बैलगाडामालक मोठ्या संख्येने उपस्थित होते़ बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवून ‘पेटा हटवा, बैल वाचवा’ या मागणीसाठी शिवनेरी शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष राजेंद्र ढोमसे यांच्या नेतृत्वाखाली पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको केला़ दरम्यान, सहायक पोलीस निरीक्षक टी़ वाय़ मुजावर, मंडलाधिकारी योगेश पाडळे व तलाठी नितीन चौरे यांनी निवेदन स्वीकारून आपल्या मागण्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहचविणार असल्याचे या वेळी सांगितले. या अंदोलनाला पुणे, नगर, कोल्हापूर जिल्ह्यातील बैलगाडा मालक-चालक, शिवनेरी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़ या कार्यक्रमाचे नियोजन शिवनेरी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र ढोमसे, बैलगाडा मालक राहुल बनकर, प्रकाश कबाडी, राकेश खैरे, डॉ़ संतोष वायाळ, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, राजेंद्र मेहेर, समीर वाजगे, हेमंत कोल्हे, नीता लांडे, योगेश तोडकर आदींनी केले़ या वेळी परमेश्वर चौधरी म्हणाले, की पुणे जिल्ह्यातील बैलगाडा शर्यती बंद केल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. जनावरे पाळण्यासाठी किती कसरत करावी लागते, हे ‘पेटा’वाल्यांना ज्ञात नाही़ पुणे जिल्ह्यातील खासदार बैलगाडा बंदीविषयी आवाज न उठवता गप्प आहेत़ मात्र बैलगाडा मालकांच्या जीवावरच हे राजकीय नेते मोठे झाले आहेत़ आता मात्र त्यांचे या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे़ प्राणी संघटनेचे सदस्य असलेले अनिल कटारीया म्हणाले, की ज्यांनी कधी शेती केली नाही, जनावरे पाळली नाहीत अशा व्यक्तींना शेतकरी व बैल यांच्यातील असलेला जिव्हाळा, शेतकरी बैलाला आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करतात़ याची जाणीव प्राणीमित्र सदस्यांना नसल्याने फक्त आपल्या स्वार्थासाठी व पेटा संघटनेच्या फायद्यासाठी ही बंदी आणली आहे़ मात्र या प्राणीमित्र सदस्यांनी ग्रामीण भागात येवून प्रत्यक्षात शेतकरी अथवा बैलगाडा मालक बैलाचा कशा प्रकारे सांभाळ करतात. त्यांना राहण्यासाठी कशा सुखसुविधा उपलब्ध केल्या आहेत हे पाहावे़ शर्यती सुरू होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे या वेळी त्यांनी सांगितले. पेटाने स्वत:च्या फायद्यासाठी ही बंदीचा घाट घातला आहे, असा आरोप रामकृष्ण टाकळकर यांनी केला आहे़ (वार्ताहर)...तर बेमुदत आंदोलन!मागील वर्षी सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविली होती़ त्या वेळी केंद्रीय परिवहनमंत्री प्रकाश जावडेकर यांनी बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी सकारात्मक भूमिका घेऊन बैलगाडा सुरू होण्यासाठी केंद्राच्या मार्फत राजपत्र जारी केले होते़ परंतु, पेटा संस्थेने पुन्हा केंद्राच्या राजपत्राच्या निर्णयाविरोधात अपील करून स्थगिती मिळविली़ यावर (दि़ २८) जुलै रोजी न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. निर्णय विरोधात गेल्यास मुंबई येथील आझाद मैदानावर या निर्णयाविरोधात अखिल भारतीय बैलगाडा मालक-चालक संघटना व शिवनेरी शेतकरी संघटनेच्या वतीने बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असे या वेळी सांगितले.