शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

पेटत्या कच:याने आळंदीकरांचा श्वास गुदमरतोय!

By admin | Updated: September 29, 2014 23:29 IST

येथील ‘पीएमपी’ बस स्थानकाशेजारी इंद्रायणी नदीपात्रलगत आळंदी नगर परिषदेने टाकलेला कचरा पेटविल्यामुळे आळंदीकरांचा श्वास गुदमरत आहे.

आळंदी : येथील ‘पीएमपी’ बस स्थानकाशेजारी इंद्रायणी नदीपात्रलगत आळंदी नगर परिषदेने  टाकलेला कचरा पेटविल्यामुळे   आळंदीकरांचा श्वास गुदमरत आहे. रात्रीच्या वेळी धुराचे लोट हवेत पसरल्यामुळे नदीकिनारी राहणा:यांना याचा त्रस होत आहे. असे प्रकार वारंवार होत आहेत.
आळंदी बस स्थानकाशेजारी आळंदी नगरपरिषद कचरा टाकते. त्यामुळे ‘दरुगधी’चाही मोठा त्रस होता. कुजलेल्या कच:याच्या विषारी धुरामुळे खोकला, दमा, श्वसनाचे विकार वाढत आहेत.  पावसामुळे कचरा पेटविण्याचे प्रकार बंद झाले होते; परंतु ऊन पडल्यामुळे आळंदीतील कचरा पुन्हा पेटू लागला आहे. रात्रीच्या वेळी शहरातील रस्त्यावर धुराचे लोट 
पसरत आहेत. 
आळंदी देवस्थानातर्फे नगर प्रशासनाला घनकचरा व्यवस्थापनासाठी पाच एकर जमीन देण्यात आली आहे. मात्र अद्याप तेथील प्रकल्प कार्यान्वीत न झाल्याने  येथे कचरा टाकला जातो. देवाच्या आळंदीत येणा:या वारकरी भाविकांना प्रथम कच:याचे दर्शन व नंतर माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घ्यावे लागते, ही आळंदीकरांसाठी लाजिरवाणी गोष्ट असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते शरद मुरडे व सुलतानभाई शेख यांनी व्यक्त केली.
तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ांतर्गत दोन महिन्यांपूर्वी कचराकुंडय़ा देण्यात आल्या आहेत. त्यादेखील कच:याने ओसंडून वाहत असल्यामुळे संपूर्ण कचरा रस्त्यावर येऊ लागला आहे. (वार्ताहर)
 
याबाबत मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याशी संपर्क साधला 
असता, त्यांनी कचरा पेटल्यामुळे आळंदीकरांना त्रस होत असल्याचे मान्य केले. ते म्हणाले, की हा कचरा वारंवार कोणी अज्ञात व्यक्ती 
पेटवतो. याविषयी आम्ही यापूर्वी पोलिसांकडेही तक्रार दिली आहे. जाणूनबुजून असे प्रकार करणो गैर आहे. देवस्थाननने दिलेल्या पाच एकर जागेतील प्रकल्पाचे काम जोरात सुरू असून लवकरच येथील 
कच:याची समस्या कायमची सुटणार आहे. आम्ही हा पेटवलेला कचरा तत्काळ उचलू किंवा तो तेथेच गाडून टाकून त्यावर मुरुमीकरण करू. हे काम दोन दिवसांत पूर्ण होईल.