शहरं
Join us  
Trending Stories
1
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
2
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
5
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
6
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
7
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
8
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
9
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
10
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
11
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
12
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
13
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
14
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
15
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
16
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
17
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
18
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
19
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
20
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...

पुणे शहरात ४ हजार रेमीडिसिव्हरचा साठा उपलब्ध; गुरुवारपर्यंत आणखी १२ हजार इंजेक्शन मिळणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2021 9:57 PM

कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येसोबत गंभीर रूग्णांची संख्याही वाढू लागली आहे.

पुणे : कोरोना रुग्णांसाठी उपयुक्त ठरत असलेल्या रेमीडिसिव्हरचे चार हजार इंजेक्शन शहरात उपलब्ध आहेत. तसेच गुरुवारपर्यंत आणखी बारा हजार इंजेक्शन शहरात प्राप्त होतील. रुग्णांना हे इंजेक्शन मिळावे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.  

कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येसोबत गंभीर रूग्णांची संख्याही वाढू लागली आहे. डॉक्टरांकडून रेमडिसिव्हिर इंजेक्शनचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. एका रुग्णाला सहा इंजेक्शन देण्यात येतात. या इंजेक्शनची किंमत शासनाने कमी केली आहे. रुग्णालयांना या इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे. काही रुग्णालयांमध्ये साठाचं नसल्याचे सांगून नातेवाईकांना बाहेरून इंजेक्शन घेऊन येण्यास सांगितले जात आहे. नागरिकांना हे इंजेक्शन मिळविताना अडचणी तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. इंजेक्शनसाठी हेल्पलाईनही सुरू केल्यानंतरही इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे. 

याबाबत, आयुक्त विक्रम कुमार यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की हे इंजेक्शन व अन्य औषधांची उपलब्धता वाढविण्यासाठी महापालिकेकडून अन्न व औषध प्रशासनासोबत सातत्याने संपर्क साधला जात आहे. सध्या शहरात ४ हजार रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा साठा असून गुरुवारी आणखी १२ हजार इंजेक्शन्स उपलब्ध होणार आहेत. --------एका कंपनीकडून रेमीडिसिव्हरचे उत्पादन बंददेशात रेमडिसिव्हीर उत्पादन करणार्‍या चार कंपन्या आहेत. त्यापैकी एका कंपनीने या इंजेक्शनचे उत्पादन बंद केले आहे. त्यामुळे इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. उर्वरीत तीनही कंपन्यांनी उत्पादन क्षमता वाढविण्यास सुरूवात केली आहे.  येत्या काळात रेमडिसिव्हीरचा तुटवडा भासणार नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.--///-इंजेक्शनच्या खरेदीसाठी महापालिका निविदा प्रक्रिया राबविणार आहे. पालिकेकडून हे इंजेक्शन खरेदी केले जाणार असल्याचे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाcommissionerआयुक्त