दहीहंडीच्या उत्सवात थरावर थर, नियम बसवले धाब्यावर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2019 06:16 PM2019-08-24T18:16:50+5:302019-08-24T18:19:27+5:30

मुंबई व पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडमध्ये दहीहंडीचे प्रमाण कमी असले तरी लहान मोठी सुमारे १७६ मंडळे हा उत्सव उत्साहात साजरा करत असतात.

step after step In the festival of Dahihandi but rules over ... | दहीहंडीच्या उत्सवात थरावर थर, नियम बसवले धाब्यावर...

दहीहंडीच्या उत्सवात थरावर थर, नियम बसवले धाब्यावर...

googlenewsNext
ठळक मुद्देपूरग्रस्तांना मदत करण्यासाठी काही मंडळांकडून यंदा होणार नाही दहीहंडीचा उत्सव

- नारायण बडगुजर
पिंपरी : कृष्ण जन्माष्टमीचा आनंद दहीहंडीतून अधिक द्विगुणीत करण्यात येत असला तरी थरावर थर चढवून विक्रम करण्याचा गोविंदा पथकांचा प्रयत्न असतो. सुरक्षिततेचे अनेक नियम असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केले जाते. सुदैवाने गेल्या काही वर्षांत या उत्सवादरम्यान उद्योगनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये जीवितहानी झालेली नाही. मात्र ठिकठिकाणी वाहतूककोंडी, तसेच ध्वनिप्रदूषण होत असल्याचे दरवर्षी दिसून येते. तथापि, उत्सव साजरा करताना नियम पाळा असे सांगण्याची वेळ आली आहे. तसेच पूरग्रस्तांच्या मदतीसाठी काही मंडळांकडून दहीहंडी उत्सव यंदा साजरा होणार नसल्याचे दिसून येते. 

मुंबई व पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवडमध्ये दहीहंडीचे प्रमाण कमी असले तरी लहान मोठी सुमारे १७६ मंडळे हा उत्सव उत्साहात साजरा करत असतात. यातील १४ मंडळे मोठी आहेत. त्यांच्याकडून सिनेतारकांना, छोट्या पडद्यावरील कलाकारांना निमंत्रित केले जाते. त्यामुळे या मंडळांच्या दहीहंडीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळते. अशा मंडळांकडून मोठ्या प्रमाणात इनामही लावले जाते. असे असले तरी पिंपरी-चिंचवडमध्ये खास असे गोविंंदा पथक किंवा गोपिका पथक असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे मुंबई आणि उपनगरांतील पथके तसेच मावळ व जिल्ह्यातील काही गोविंदा पथके या दहीहंडी फोडून या ह्यइनामाह्णचे लोणी चाखतात. मात्र हा उत्सव साजरा होत असताना ध्वनिप्रदूषण होते व वाहतूक नियमन होत नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होते.

मोठ्या मंडळांसाठी बंदोबस्त उपलब्ध करून देण्यात येणार असून, पोलिसांनी मंडळांना सूचना केल्या आहेत. वाहतूक नियमनासाठी मंडळांनी स्वयंसेवक नियुक्त करावेत, संशयित व्यक्ती, वाहन आढळल्यास पोलिसांना माहिती द्यावी. न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. 

पिंपरी-चिंचवडची दहीहंडी;  मुंबईचे गोविंदा पथक
 पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरी, निगडी, सांगवी, चिंचवडगाव, परिसरात काही जुनी मंडळे आहेत.  याठिंकाणी पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. मात्र पिंपरीगाव तसेच आयटी पार्क असलेल्या माण येथे पारंपरिक पद्धतीने दहीहंडी उत्सव साजरा होतो. एका लाकडी खांबाला दोरीच्या साह्याने दहीहंडी बांधली जाते. पारंपरिक वाद्य वाजवून मान असलेल्या व्यक्तीकडून खांबावर चढून किंवा लाकडी काठीने किंवा डोक्याने दहीहंडी फोडली जाते. त्यानंतर गोपाळकाल्याचे वाटप केले जाते. भोसरी, हिंजवडी, वाकड, निगडी, पिंपरीगाव, रहाटणी आदी भागांत मोठ्या दहीहंडीचे आयोजन केले जाते. त्यात सिनेतारकांचे आकर्षण असते. यातील काही दहीहंडीला कापोर्रेट लूक असतो. लाखो रुपयांची बक्षिसे असतात.

अशी आहे नियमावली
१८ वर्षांखालील गोविंदाचा सहभाग नसावा.
२० फुटांपेक्षा अधिक उंच दहीहंडी नसावी.
सुरक्षिततेची उपकरणे अत्यावश्यक.
मानवी मनोºयावर पाण्याचा मारा करू नये.
कच्च्या, जुन्या इमारतीला दहीहंडी बांधू नये.
कायदा सुव्यवस्थेची खबरदारी घ्यावी.
दहीहंडीच्या ठिकाणी कर्कश्य डिजेचा वापर शक्यतो टाळावा.
आपत्कालीन व्यवस्था असावी.

दहीहंडी उत्सवासाठी मंडळांनी सुरक्षीततेची खबरदारी घ्यावी. वैद्यकीय सेवा, रुग्णवाहिका, गादी किंवा मॅट आदी सुविधा मंडळांकडे उपलब्ध असाव्यात. उत्सव मुख्य रस्त्यावर साजरा करू नये. वाहतूक नियमांचे पालन करून तसेच गोंधळ, हुल्लडबाजी होणार नाही, यासाठी मंडळांनी गदीर्चे नियमन करावे. 
- रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

तरुणांसाठी आकर्षणाचा विषय असला तरी दहीहंडी उत्सव साजरा करताना सुरक्षाही महत्त्वाची आहे. त्यामुळे सुरक्षीततेचे सर्व नियम पाळतो.  गर्दी असूनही दुर्घटना घडलेली नाही. पुराचे संकट ओढावल्याने यंदा हा उत्सव साजरा न करता पूरग्रस्तांना मदत करण्यात येईल.  
- राम वाकडकर, संस्थापक, सद्गुरू मित्र मंडळ, वाकड

Web Title: step after step In the festival of Dahihandi but rules over ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.