शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

MPSC 2026: राज्य सेवा मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; पात्र ठरलेल्या उमेदवारांची परीक्षा २९ मार्च ते २६ एप्रिलदरम्यान पार पडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 13:36 IST

MPSC Recruitment 2026: अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा पार पडेल, असे आयाेगाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे

पुणे : राज्य लाेकसेवा आयाेगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा-२०२५ चा निकाल २७ फेब्रुवारी रोजी जाहीर केला आहे. आता मुख्य परीक्षेसाठी एकूण १३९ पदांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्याचे वेळापत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

अर्ज सादर करण्याची आणि ऑनलाइन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची मुदत १४ मार्च २०२६ रोजी रात्री २३:५९ पर्यंत आहे. तर भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची मुदत १६ मार्च रोजी रात्री २३:५९ पर्यंत आहे. चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत १७ मार्च रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत आहे. पात्र उमेदवारांनी याची नाेंद घ्यावी, असेही राज्य लाेकसेवा आयाेगाने म्हटले आहे.

दरम्यान, विविध विभागांकडून प्राप्त मागणीपत्रानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२५ ची जाहिरात १८ मार्च २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. पुढे अतिरिक्त मागणी विचारात घेऊन राज्य आयाेगाने ८ जानेवारी आणि २० फेब्रुवारी २०२६ रोजी शुद्धिपत्रके प्रसिद्ध केली आहेत. त्यानुसार पूर्वपरीक्षा झाली आणि त्याचा निकालही प्रसिद्ध झाला. यात पात्र ठरलेल्या उमेदवारांची राज्य सेवा मुख्य परीक्षा २९ मार्च ते २६ एप्रिलदरम्यान पार पडणार आहे. अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा पार पडेल, असे आयाेगाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

नियाेजित वेळापत्रक

दिनांक : सकाळचे सत्र (विषय) आणि दुपारचे सत्र (विषय)

२९ मार्च : भाषा पेपर-१ : भाषा पेपर-२५ एप्रिल : निबंध, पेपर-३

१८ एप्रिल : सामान्य अध्ययन -१, पेपर-४ : सामान्य अध्ययन-२, पेपर-५१९ एप्रिल : सामान्य अध्ययन-३, पेपर-६ : सामान्य अध्ययन-४, पेपर-७

२६ एप्रिल : वैकल्पिक विषय, पेपर- ८ : वैकल्पिक विषय, पेपर - ९

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra State Service Main Exam Schedule Released; Exam from March 29 to April 26

Web Summary : MPSC announces State Service Main Exam 2025 schedule. Exams for 139 posts from March 29 to April 26 in various cities. Apply online by March 14, 2026.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थीTeacherशिक्षकMPSC examएमपीएससी परीक्षा