शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

महिला डॉक्टरांच्या स्नानगृहात छुपा स्पाय कॅमेरा प्रकरण : 'त्या' डॉक्टराबाबत धक्कादायक बाब समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 22:44 IST

भारती विद्यापीठ परिसरातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरांच्या स्नानगृह व शयनकक्षात छुपा स्पाय कॅमेरा लावणारा एमडी डॉक्टरच निघाल्याने एकच खळबळ उडाली होती.

पुणे : भारती विद्यापीठ परिसरातील एका प्रशिक्षणार्थी डॉक्टर महिलेच्या स्नानगृह व शयनकक्षात स्पाय कॅमेरा लावणाऱ्या सुजित जगताप या डॉक्टराने या घटनेपूर्वी ८ दिवस अगोदर अशाप्रकारे स्पाय कॅमेरा लावल्याचे उघडकीस आले आहे.

डॉ. सुजित आबाजीराव जगताप (वय ४२, रा. सिंहगड रोड) असे या डॉक्टरचे नाव आहे. सुजित जगताप हा मेंदूविकारतज्ञ आहे. तो तेथील महाविद्यालया लेक्चर घेण्यासाठी नेहमी जातो. त्यावरुन त्याची तेथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरांशी चांगली ओळख झाली होती. विद्यार्थीनी आणि प्राध्यापक या नात्याने त्याने त्यांच्याशी बोलताना नकळत त्यांच्या रुमची चावीचे ठसे घेतले होते. त्याद्वारे त्याने त्यांच्या रुमची डुप्लिकेट चावी तयार करुन घेतली होती. त्यानंतर त्याने ॲमेझॉनवरुन कॅमेरा असलेले बल्ब खरेदी केले. त्याचे सेटिंग कसे असते, याचे प्रात्याक्षिक त्याने स्वत:च्या घरी केले होते. त्यानंतर या घटनेच्या अगोदर ८ दिवसांपूर्वी त्याने या महिला डॉक्टर हॉस्पिटलमध्ये असल्याचे पाहून बनावट चावीद्वारे रुम उघडून त्यांच्या स्नानगृह व बेडरुममध्ये हे कॅमेरा असलेले बल्ब लावले होते. त्यानंतर तो पुन्हा दुसर्या दिवशी अशाच प्रकारे त्यांच्या रुममध्ये गेला होता. त्याने ते बल्ब काढून घेतले. त्यानंतर घरी येऊन ते पाहिले. मात्र, त्यात रेकॉर्डिंग झाले नसल्याचे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर त्याने ६ जुलै रोजी पुन्हा दुपारच्या वेळी त्यांच्या रुममध्ये जाऊन हे बल्ब लावले. मात्र, यावेळी या महिला डॉक्टरांच्या हा प्रकार वेळीच लक्षात आला. त्यांनी पोलिसांकडे धाव घेतले.

भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत हा प्रकार नव्याने समोर आला आहे.याबाबत पोलीस निरीक्षक संगिता यादव यांनी सांगितले की, सुजित जगताप याने ओळखीतून बनावट चावी तयार करुन घेतली होती. त्याद्वारे तो त्यांच्या नकळत रुममध्ये शिरला होता. हे घृणास्पद कृत्य करण्यामागे काय उद्देश होता. याबाबत तो अजूनही काहीही सांगत नाही. यातील स्पाय कॅमेरा व अन्य साहित्य तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकdoctorडॉक्टर