देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर पुणे जिल्ह्यात आपली गॅस सबसिडी ‘गिव्ह इट अप’ करण्यासाठी विविध माध्यमांतून लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यात ‘लोकमत’च्या वतीने घेण्यात आलेली मोहीम कौतुकास्पद आहे. ‘लोकमत’मध्ये ‘आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांना सुटेना गॅस अनुदानाचा मोह’ ही बातमी वाचल्यानंतर मी स्वत: पुढाकार घेऊन सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये ‘गिव्ह इट अप’संदर्भात खास मोहीम हाती घेण्यात येणार आहे. याची सुरुवात मी माझ्यापासून करत असून, गुरुवारी माझी गॅस सबसिडी परत करण्यासाठी अर्ज भरून देत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील श्रीमंत लोकांना शासनाच्या वतीने देण्यात येणारे गॅस सिलिंडरचे अनुदान नाकारण्याचे आवाहन केले होते. या अनुदानाचा देशाच्या विकासासाठी उपयोग करण्यात येणार असल्याचे मोदी यांनी सांगितले. मोदी यांच्या आवाहनानंतर जिल्ह्यातील बहुतेक सर्व आमदार-खासदार यांनी आपली गॅस सबसिडी परत केली आहे. पण ही जनजागृती अद्याप सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये नाही. जिल्ह्यात गेल्या तीन-चार महिन्यांपासून ही मोहीम सुरू असून, आतापर्यंत ६० हजारपेक्षा अधिक लोकांनी आपली गॅस सबसिडी परत केली आहे. जनजागृती करण्यासाठी विविध माध्यमांतून प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.
गॅस अनुदान नाकारण्यासाठी खास मोहीम राबविणार
By admin | Updated: August 6, 2015 03:26 IST
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर पुणे जिल्ह्यात आपली गॅस सबसिडी ‘गिव्ह इट अप’ करण्यासाठी विविध माध्यमांतून लोकांमध्ये जनजागृती करण्यात आली
गॅस अनुदान नाकारण्यासाठी खास मोहीम राबविणार
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}