शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

‘विकासाची पहाट’ पाहण्यासाठी सोनेसांगवीकर एकवटले

By admin | Updated: September 1, 2016 01:41 IST

तरुणाईनं दिली हाक, लोकसहभागातून आणली विकासाची पहाट... ही परिस्थिती बदललीय सोने सांगवी गावानं... निवडणुका बिनविरोध करून खऱ्या अर्थानं तंटामुक्तीला दिशा देत

टाकळी हाजी : तरुणाईनं दिली हाक, लोकसहभागातून आणली विकासाची पहाट... ही परिस्थिती बदललीय सोने सांगवी गावानं... निवडणुका बिनविरोध करून खऱ्या अर्थानं तंटामुक्तीला दिशा देत गावचा विकास हाच आमचा कयास म्हणत ग्रामस्थ एकवटले आहेत.रांजणगाव गणपतीपासून अवघ्या पाच कि. मी. अंतरावर डोंगराच्या कुशीत हे गाव आहे. अवघ्या दोन हजार लोकसंख्येच्या या गावात जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुण कार्यकर्ते एकवटले. गावचा विकास करायचाच, हाच निर्धार केला.राळेगणसिद्धी, हिवरे बाजारच्या विकासाचा आदर्श डोळ्यांसमोर होताच. प्रथम ग्रामपंचायत निवडणुकी झाल्या. महिलांना सरपंचपदाचा मान मिळाला. अलका कदम प्रथम सरपंच केल्या. त्यानंतर सुजाता संभाजी डांगे यांचीही निवड बिनविरोध केली. गावच्या सोसायटीच्या चेअरमनपदी सुरेश टाकळकर, उपाध्यक्षपदी रामदास काळे, तसेच तंटामुक्तीच्या अध्यक्षपदी तिसऱ्यांदा मल्हारी काळे यांची निवड करण्यात आली.गावातील तरुणांनी पुढाकार घेतल्याने ४0 हेक्टर गायरान जमिनीवर ३३ हजार झाडांची लागवड करून जिल्ह्यात उच्चांक केला. सध्या झाडे चांगल्या प्रकारे वाढीस लागले असून, ग्रामस्थांचे लक्ष आहे. चराई बंदी, कुऱ्हाड बंदी, पाणी आडवा पाणी जिरवा, हा संकल्प हाती घेतला असून, गाव हिरवाईने नटले आहे.शिक्षणातही गाव मागे राहू नये म्हणून आय. टी. सी. राऊंड टेबल संस्था पुणे यांनी आठ खोल्यांसाठी निधी दिला. मात्र, लोकवर्गणी हवीय, ती दहा लाख रुपये जमा करण्याचे आव्हान ग्रामस्थांपुढे होते. संस्थांनी ५० लाख रुपये दिले; मात्र गावातील ग्रामस्थांनीही लोकवर्गणीतून १० लाख रुपये जमवून गावचा शैक्षणिकदृष्ट्या विकास करण्याचा विडा उचलला आहे.गावातील वाद गावांतच मिटवून विकासाची दिशा देणार असल्याचे तंटामुक्तीचे अध्यक्ष मल्हारी काळे यांनी सांगितले. तर, सोसायटीच्या माध्यामतून महिला बचत गट, तसेच शेतकऱ्यांना पीककर्ज देऊन हिवरे बाजारप्रमाणे येथील शेतकऱ्यांना आदर्श पीक पद्धतीचे नियोजन करण्याचा संकल्प सोसायटीचे चेअरमन सुरेश टाकळकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)