शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

देखाव्यांतून समाजप्रबोधन

By admin | Updated: September 25, 2015 00:57 IST

गाणी, नृत्य, विनोद, बोली भाषेचा समर्पक वापर करून जिवंत देखावे सादर केले जात आहेत. या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचा वसा शहरातील कलाकार आणि कार्यकर्त्यांनी घेतला आहे

मिलिंद कांबळे, पिंपरी गाणी, नृत्य, विनोद, बोली भाषेचा समर्पक वापर करून जिवंत देखावे सादर केले जात आहेत. या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचा वसा शहरातील कलाकार आणि कार्यकर्त्यांनी घेतला आहे. शासनाच्या प्रसिद्धीपेक्षा या माध्यमातून गणेशोत्सवात होणारी जनजागृती अधिक परिणामकारक ठरत आहेत. शहरात जिवंत देखावा सादर करणाऱ्या मंडळांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे यंदा ६०पेक्षा अधिक ठिकाणी जिवंत देखावे पाहावयास मिळत आहेत. सद्य:स्थिती, समाजप्रबोधन, जनजागृती आदी विषयांना हात घालत शहरातील नवोदित कलाकारांचे ग्रुप मंडळामध्ये आपली कला प्रदर्शित करीत आहेत. लाभले भाग्य बोलतो मराठी, शोध नवा भारताचा, शेतकऱ्यांची आत्महत्या, माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम, शेतकरी दिन, स्वांतत्र्याचा लढा, स्वच्छ भारत, पाणी वाचवा, सोशल मीडियाचा मारा, नवी पिढी, व्यसनाधीनता, चंगळवाद, तसेच पौराणिक आणि ऐतिहासिक देखावे जिवंत रूपात मांडण्यात आले आहेत. एखादा विषय घेऊन त्यावर संवादलेखन करून पटकथा तयार केली जाते. संगीत, गाणी यांचा वापर करून सीडी तयार केली जाते. त्या अनुषंगाने कलाकार नृत्य, कला आणि संवाद सादर करतात. सुमारे २० ते ४० मिनिटांचा ‘शो’ असतो. तसेच, विनोद आणि गमतीदार प्रसंगांची पेरणी केली जाते. यामुळे देखावा अधिक प्रभावी ठरतो. असे जिवंत देखावे, पाहण्यासाठी गर्दी होत आहे. दिवसातून ५ ते ६ शो सादर केले जातात. यामध्ये कला आणि नृत्य असे दोन प्रकार आहेत. गु्रपसोबत मंडळाचे कार्यकर्ते जिवंत देखाव्यात सहभाग घेत आहेत. एका देखाव्यात साधारण ५ ते २५ कलाकारांचा समावेश असतो. त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश वाढत आहे. संस्कृती क्रिएशनच्या आशा नेगी यांनी सांगितले, ‘‘ग्रुपतर्फे सन २००३पासून जिवंत देखावे सादर केले जात आहेत. दर वर्षी ६ मंडळांमध्ये देखावे असतात नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळते. यातून अनेक कलाकार नाटक, टीव्ही आणि चित्रपटांत झळकले आहेत.’’ स्वामी समर्थ गु्रपच्या सुरेखा बाविस्कर यांनी सांगितले, ‘‘स्थानिक कलाकारांना एकत्रित करून देखावे सादर केले जातात. गणेशोत्सवात रोज रात्री पथकाचे शो होतात. शेकडो नागरिक देखाव्यांचा आनंद घेतात. या माध्यमातून गणेशाची अनोखी भक्ती केली जाते.’’