शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

...त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही : ठाकरे सरकारमधील 'या' मंत्र्यांचे मोठे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 19:11 IST

महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांकडून पुन्हा लॉकडाऊनचे संकेत देण्यात येत आहे...

इंदापूर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून अनेक निर्बंध देखील लागले गेले आहे. मात्र तरीदेखील दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यात अपयश आले आहे. त्यामुळे राज्यातील काही मंत्र्यांकडून पुन्हा लॉकडाऊनचे संकेत देण्यात येत आहे. आता मात्र ठाकरे सरकारमधील एका मंत्र्याने राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर होणार नाही असे मोठे विधान व्यक्त केले आहे.  

लॉकडाऊनच्या भीतीने शेतकरी राजा शंभर रुपयांची वस्तू ७० रुपयाला विकतो आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठया प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याने त्यांचे कुटुंब अडचणीत आले आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होणार नाही, असे स्पष्ट संकेत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूरात दिले.

इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात वाढत्या कोरोना संदर्भात आढावा बैठक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद  यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. भगवान पवार, नायब तहसीलदार अनिल ठोंबरे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट,पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. प्रशांत महाजन यांसह विविध अधिकारी उपस्थित होते.

भरणे म्हणाले, राज्यात लॉकडाऊन होणार नाही, परंतु जनतेने काळजी घेणे गरजेचे आहे. शासनाने निर्देशित केलेले नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू न देणे, घराबाहेर फिरताना मास्कचा वापर केला पाहिजे. जर लॉकडाऊन जाहीर झाले तर काहीजण विनाकारण लॉकडाऊनच्या नावाखाली साठेबाजारी करतात. शेतमालाचे बाजार भाव पाडतात असे प्रयत्न होत असतात.त्यामुळे लॉकडाऊन होणार नाही.

इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात ७६ तर शहरात ३२ रुग्ण हे कोरोनाबाधित आहेत. अशा १०८ व्यक्तींवर सध्या उपचार सुरु आहे. ग्रामीण भागातील भिगवण आणि पळसदेव या दोन गावातून रुग्णांची संख्या अधिक आहे. तर शहरातील आंबेडकरनगरमध्ये बाधित रुग्णांची संख्या अधिक आहे. कोरोनाचे संकट अद्याप संपलेले नाही.असे आवाहन त्यांनी केले. 

जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहीम शासन प्रभावीपणे राबविणार आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावावर मागील दोन दिवसात हाॅटस्पाॅट असणाऱ्या ठिकाणच्या नव्वद व्यक्तींची कोरोना चाचणी केल्यानंतर आठ जण बाधित आढळले. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र,उपजिल्हा रुग्णालय,कोवीड केअर सेंटर आदी या ठिकाणचे कमी करण्यात आल्याचे मनुष्यबळ पुन्हा वाढवण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. _____________

इंदापूर शहराला मिळणार स्वतंत्र अद्यावत रुग्णवाहिकाशहराला सध्या रुग्णवाहिकेची कमतरता भासत आहे. भविष्यातील धोका टाळण्यासाठी रूग्णवाहिकेची नितांत गरज पाहून नागरिकांसाठी अद्यावयत अशी सर्व सुविधांयुक्त प्रणाली असलेली रुग्णवाहिका तातडीने स्वतःच्या निधीतून देणार असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आढावा बैठकीत घोषित केले.

टॅग्स :Indapurइंदापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याState Governmentराज्य सरकारUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवार