शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात साधेपणाने जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथाचा विवाहसोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मोरगाव : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वत्र सकाळपासूनच लगीनघाईची गडबड सुरू होती ती ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मोरगाव : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सर्वत्र सकाळपासूनच लगीनघाईची गडबड सुरू होती ती विवाह निमित्ताने. काही मोजक्याच गावपुढारी मंडळींच्या उपस्थितीत विवाह संपन्न करायचा; मात्र विवाह मुहूर्त ढळू नये याची काळजी सर्वच घेत होते. वऱ्हाडी मंडळी अवघी पाच-सहा. ही मंडळी सकाळपासूनच या विवाहाची वाट पाहत होते. हा विवाह होता जोगेश्वरी माता व श्री भैरवनाथ यांचा. सोमवारी दुपारी १२ वाजता तर काही गावांत सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास या मुहूर्तावर तालुक्यात विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

बारामती तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश गावागावांतील ग्रामदैवत म्हणून भैरवनाथ देवता पुजली जाते. सलग दुसऱ्या वर्षी कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे भैरवनाथ व जोगेश्वरी मातांच्या विवाहा निमित्ताने ग्रामस्थ व भाविक मंडळी लग्नसभारंभात भाग घेता आला नाही. मोरगाव, मुर्टी, तरडोली, लोणी भापकर, काऱ्हाटी, जळगाव सुपे, देऊळ्गाव रसाळ तसेच पुरंदर तालुक्यातील वाल्हे, मांडकी आदी सर्वच गावांत विवाह संपन्न झाला.

श्री भैरवनाथाचे मंदिर ज्या गावात आहेत अशा सर्वच गावांत संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात कालाष्टमी निमित्ताने हा विवाह संपन्न झाला आहे. सायंकाळी लोणी भापकर येथे हा विवाह संपन्न होऊन दरवर्षी भैरवनाथ यात्रेस सुरुवात होते. मात्र, यंदा केवळ विवाह सोहळा संपन्न झाला असून यात्रा रद्द केली आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात अखंड समाजाचे ग्रामदैवत समजले जाणाऱ्या भैरवनाथांचा विवाह काही गावांमध्ये दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास, तर काही गावांत सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास संपन्न झाला. यंदा लगीनघाई असून नेहमी गजबजणाऱ्या गावांत कोरोना या आजारामुळे शुकशुकाट पहावयास मिळत होता.