दौंड : दौंड येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा बलात्कार करून खून करण्याची विद्यार्थ्यांने सुपारी दिल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान ही घटना दाबण्याचा प्रयत्न करणारे शाळेच्या मुख्याध्यापकासह वर्ग शिक्षक, शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने शाळेच्या कॅलेंडरवर पालकाची सही स्वतः केली होती. परिणामी माहिती इयत्ता सातवीतील एका विद्यार्थिनीने वर्ग शिक्षिकेला सांगितली. या प्रकारामुळे संबंधित मुलगा चिडला. दरम्यान शाळेतील अन्य एका विद्यार्थ्याला त्या मुलीचा बलात्कार करून खून करण्याची सुपारी दिली. चिडलेल्या त्या विद्यार्थ्याने शाळेतीलच दुसऱ्या विद्यार्थ्याला शंभर रुपये देऊन संबंधित मुलीचा बलात्कार करून खून करण्याची सुपारी दिली होती.