शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
3
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला पूर्ण; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
4
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
5
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
6
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
7
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
8
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
9
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
10
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
11
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
12
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
13
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
14
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
15
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
16
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
17
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
18
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
19
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
20
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
Daily Top 2Weekly Top 5

औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 17:43 IST

कार व हातातील कड्यावरून नातेवाईकांना मयताची ओळख पटली

महेबूब बक्षी/औसा- रात्री ११:३० ते १२ वाजण्याच्या सुमारास औसा-सोलापूर महामार्गापासून ५०० मिटर अंतरावर वानवडा रस्त्यावर कार जळत असल्याचा ११२ ला कॉल आला. त्यानंतर तात्काळ औसा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असता, कार भीषण आगीत जळत असल्याचे दिसले. तात्काळ पोलिसांनी अग्निशमन दलाला बोलावून आग विझवण्याचा प्रयत्न केला. बऱ्याचवेळानंतर आग विझली, पण आतील दृष्य भयावहहोते. या आगीत एका ३५ वर्षीय तरुणांचा जळून कोळसा झाल्याचे पोलिसांना आढळले.

ही घटना अतिशय भयावह होती. तब्बल साडेतीन ते चार तास  भीषण आगीत जळत असलेल्या (एम एच ४३ एबी ४२००)  कारची राख झाली होती. तर आतील इसमही ९५ टक्के जळालेल्याने त्याच्या कवटीसह काही उरलेला भाग गोणीत भरुन नेण्यात आला.

माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेवून कार व आत मिळालेल्या कड्याच्या मदतीने मयत तरुण औसा तांडा येथील गणेश गोपीनाथ चव्हाण (वय ३५) असल्याचे सांगितले. मयताची डीएनए चाचणी केल्यानंतरच त्याची खरी ओळख पटेल, असे पोलिस निरीक्षक रेवणनाथ ढमाले यांनी सांगितले आहे.

ही संपूर्ण घटना पाहता गणेश चव्हाणचा घातपात झाल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून, आरोपीला तात्काळ शोधा अशी मागणीही केली आहे. सध्या औसा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

घातपात की आत्महत्या किंवा आणखीन काय? हे तपासात होणार निष्पन्ननातेवाईकांच्या माहितीनुसार, मयत गणेश चव्हाण हा खाजगी कंपनीत मोठ्या पदावर कार्यरत होता. त्याच्याकडे आर्थिक व्यवहारासह इतरही कामे होत होती. लातूर डिव्हीजनचा प्रमुख असलेल्या गणेश चव्हाण हा सध्या औशात वास्तव्यास होता. पैशाची देवाण-घेवाण, अनैतिक संबंध किंवा इतर कारणांची चौकशी केली जाणार आहे. त्यानंतरच या घटनेचे कारण समोर येईल. घटनेची सत्यता लवकरच समोर येईल असे पोलिस निरीक्षक ढमाले यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Ausa: Man Burned Alive in Car; Foul Play Suspected

Web Summary : A man was found burned beyond recognition in a car on the Ausa-Vanvada road. Relatives suspect foul play, citing the victim's high-profile job and possible financial motives. Police are investigating all angles, including potential murder or suicide.
टॅग्स :fireआगAccidentअपघातcarकारlaturलातूर