शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 19:06 IST

Bondi Beach shooting: ऑस्ट्रेलियातील सिडनी शहरात झालेल्या गोळीबारात किमान 10 लोकांचा मृत्यू झाला आहे.

Bondi Beach shooting: ऑस्ट्रेलियात आज एक धक्कादायक घटना घडली. जगातील सर्वात सुरक्षित शहरांपैकी एक मानल्या जाणाऱ्या सिडनी शहरातील बॉन्डी बीच परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात 10 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला असून, मृतांमध्ये दोन पोलिस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. दरम्यान, या गोळीबाराच्या घटनेत इंग्लंडचा माजी कर्णधार आणि दिग्गज क्रिकेटपटू मायकेल व्हॉन थोडक्यात बचावला.

बॉन्डी बीच परिसरात भीतीचे वातावरण

रविवारी बॉन्डी बीच परिसरात अचानक गोळीबार सुरू झाल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. नागरिक जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे धावू लागले. घटनेनंतर संपूर्ण परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली आहे. पोलिस आणि आपत्कालीन सेवा घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने या घटनेला दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले आहे.

मायकेल व्हॉन रेस्टॉरंटमध्ये लपला 

या घटनेच्या वेळी मायकेल व्हॉन बॉन्डी बीच परिसरातच होता. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेची माहिती दिली. व्हॉनने लिहिले, "बॉन्डीमधील एका रेस्टॉरंटमध्ये लपून बसणे हा अत्यंत भयावह अनुभव होता. सध्या मी पूर्णपणे सुरक्षित आहे. आपत्कालीन सेवांचे आणि त्या व्यक्तीचे आभार, ज्यांनी त्या हल्लेखोराला रोखले."

सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."

मायकेल व्हॉनची क्रिकेट कारकीर्द 

2005 मध्ये मायकेलच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने अ‍ॅशेस मालिका 2-1 ने जिंकली. त्याच्या नेतृत्वात इंग्लंड जागतिक क्रमवारीत अव्वल कसोटी संघ ठरला. 51 कसोटी सामन्यांत मायकेलने कर्णधारपद भूषवले असून, त्यात 26 विजय, 11 पराभव आणि 14 सामने अनिर्णित राहिले.

समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...

नेमकी घटना काय?

सिडनी शहरातील बॉन्डी बीच परिसरा ज्यू समुदायातील तब्बल दोन हजार लोक आपल्या कुटुंबीयांसह या कार्यक्रमाला हजर होते. चाबाद या ज्यू संघटनेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी 6 वाजता अचानक दोन सशस्त्र हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. गोळीबाराचा आवाज ऐकून धावपळ सुरू झाली. या घटनेत किमान 10 लोकांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी दोन्ही हल्लेखोरांना ताब्यात घेतले.

English
हिंदी सारांश
Web Title : England's ex-captain Michael Vaughan escapes Bondi Beach shooting; hid in restaurant.

Web Summary : A shooting at Bondi Beach, Sydney, killed over ten, including police. England's ex-cricket captain Michael Vaughan was present and hid in a restaurant. He is now safe and thanked emergency services. Authorities suspect terrorism.
टॅग्स :Australiaआॅस्ट्रेलियाFiringगोळीबारEnglandइंग्लंड