शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
2
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
3
Top Marathi News Live: मुंबई: मरीन ड्राईव्हवर मोठा अपघात, बाईकने एकाला उडवलं, तिघांचा मृत्यू
4
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
5
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
6
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
7
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
8
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
9
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
10
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
11
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
12
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
13
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
14
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
15
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
16
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
17
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
18
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
19
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
20
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
Daily Top 2Weekly Top 5

Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 17:52 IST

अमरावतीतील तरुणीचे पुण्यातील हवेली तालुक्यातील तरुणासोबत लग्न झाले. पण, सहा महिन्यामध्येच तिला त्रास देणं सुरू झाले. पतीचे दामिनी नावाच्या तरुणीसोबत संबंध असल्याचे तिला कळले. त्यानंतर पतीच्या गर्लफ्रेंडनेच तिला धमक्या देणं सुरू केलं. 

Pune Crime News: अमरावती जिल्ह्यात असलेल्या चांदूर रेल्वे तालुक्यातील एका ३० वर्षीय तरुणीचे हवेली तालुक्यातील अमोल नावाच्या तरुणासोबत लग्न झाले. सुरूवातीचे सहा महिने तिला चांगली वागणूक मिळाली, पण त्यानंतर पती आणि सासरच्या मंडळींनी खरे रंग दाखवायला सुरूवात केली. काही दिवसांनी पतीचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे विवाहितेला कळले. इतकेच नाही, तर अमोलचे संबंध असलेल्या तरुणीने विवाहितेला थेट धमकीच दिली. या प्रकरणी आता चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  चांदूर रेल्वे तालुक्यातील माहेरवाशिण असलेल्या तरूणीचे रीतीरिवाजाप्रमाणे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात राहणाऱ्या अमोल नामक तरुणाशी लग्न झाले. लग्नानंतर सहा महिने सासरच्या मंडळींनी तिला चांगली वागणूक दिली. मात्र त्यानंतर तिला त्रास देणे सुरू झाले. 

अमोलचे दामिनीसोबत प्रेमसंबंध

दरम्यान, पती अमोल याचे दामिनी नामक २७ वर्षीय तरुणीशी प्रेमसंबंध असल्याची जाणीव तिला झाली. त्यामुळे तिने पतीला जाब विचारला. त्यावेळी पतीने तिला काहीही न म्हणता उलट पत्नीलाच त्रास देणे सुरू केले. 

तुझ्या बायकोला सोडचिठ्ठी दे, अशी मागणी दामिनी नामक ती महिला अमोलकडे करीत होती. 

त्यानंतर तिने थेट विवाहितेलाच धमकी दिली. 'अमोलला सोडचिठ्ठी देऊन, तू तुझ्या माहेरी निघून जा, नाही गेली तर तुला पाहून घेईल, अशी धमकी दामिनी हिने दिल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.

सासू-सासऱ्यांनी आपल्याला तू चांगली नाहीस, तुला बाहेर फिरायला पाहिजे, म्हणून आपल्याशी वाद घातला, असे विवाहितेने म्हटले आहे. ३० वर्षीय विवाहितेच्या तक्रारीवरून चांदूर रेल्वे पोलिसांनी १२ डिसेंबर रोजी तिच्या पतीसह त्याच्या प्रेयसीविरुद्ध कौटुंबिक छळाचा गुन्हा नोंदविला. 

दोन लाख आण, तरच परत ये

सासरचा तो त्रास असह्य झाल्याने ती माहेरी परतली. तेव्हा पतीने तिला माहेरहून 'दोन लाख रुपये घेऊन येशील, तेव्हाच घरी परत ये. नाहीतर येऊ नकोस', अशी धमकी दिली. दरम्यानच्या काळात तिचा पती सोनगावला आला. 'तुमच्या मुलीला मला वागवायचे नाही, मला सोडचिठ्ठी पाहिजे', असे म्हणून त्याने विवाहितेच्या आईवडिलांना शिवीगाळ केली, असेही फिर्यादीने म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: Wife threatened by husband's girlfriend; domestic abuse case filed.

Web Summary : A Pune woman was threatened by her husband's girlfriend to leave him. Facing harassment and dowry demands, she filed a domestic abuse case against her husband and his girlfriend.
टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याhusband and wifeपती- जोडीदारDomestic Violenceघरगुती हिंसाPoliceपोलिस