शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 09:20 IST

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जगात खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद आता भारतीय राजकारणातही उमटू लागले आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणावर भाष्य करताना केंद्र सरकारला गंभीर इशारा दिला.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण जगात खळबळ उडाली. या घटनेचे पडसाद आता भारतीय राजकारणातही उमटू लागले आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणावर भाष्य करताना केंद्र सरकारला गंभीर इशारा दिला. "भारतातील सद्यस्थिती ही अमेरिकेतील परिस्थितीशी मिळतीजुळती आहे," असा दावा त्यांनी केला आहे.

नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी ट्रम्प यांच्या धोरणांवर सडकून टीका केली आणि त्याचा संबंध भारतीय राजकारणाशी जोडला. ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे विश्लेषण करताना वडेट्टीवार म्हणाले की, "जसे पेराल, तसे उगवेल... आपल्या कर्मांची फळे प्रत्येकालाच भोगावी लागतात. ट्रम्प यांनी सत्तेत असताना आणि सर्वोच्च पदावर असताना संपूर्ण जगावर वर्चस्व गाजवण्याच्या उद्देशाने अनेक राष्ट्रांना आपल्या नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या याच अहंकारातून आणि चुकीच्या धोरणांमुळे अमेरिकन जनतेत असंतोष निर्माण झाला आणि त्याचेच रुपांतर या हल्ल्यात झाले आहे."

केंद्र सरकारला इशारा

विजय वडेट्टीवार यांनी भारतातील सद्यस्थितीवर चिंता व्यक्त करताना म्हटले की, "ज्याप्रमाणे अमेरिकेत घटना घडल्या, अगदी तसाच घटनाक्रम सध्या भारतातही सुरू आहे. अमेरिकेत लोक रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करत आहेत. मात्र, भारतात सध्या तशी आंदोलने दिसत नसल्यामुळे सत्ताधाऱ्यांना वाटते की 'सर्व काही आलबेल' आहे. परंतु, प्रत्यक्षात लोकांच्या मनात मोठा असंतोष असून, भारत देशही विनाशाच्या दिशेने वाटचाल करत आहे, अशी भावना जनतेत आहे."

वडेट्टीवार यांच्या वक्तव्याची चर्चा

एका उच्च पदस्थ व्यक्तीवर असा हल्ला होणे दुर्दैवी असल्याचे मान्य करतानाच, वडेट्टीवार यांनी हा एक स्पष्ट इशारा असल्याचे सांगितले. "जर एखादा नेता जनतेच्या भावनेचा विचार न करता मनमानी वर्तन करत असेल, तर जनता त्यांना नक्कीच जाब विचारते आणि जबाबदार धरते," असेही त्यांनी स्पष्ट केले. वडेट्टीवार यांच्या या विधानामुळे आता राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : India on path to destruction like America: Vijay Wadettiwar.

Web Summary : Congress leader Vijay Wadettiwar warns India is mirroring America's path to destruction. He links Trump's policies and public discontent to India's current situation, citing potential unrest due to government actions. He suggests leaders must heed public sentiment.
टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पWarयुद्ध