Join us
Daily Top 2Weekly Top 5

२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 09:15 IST

नव्या कर पद्धतीतील सवलतींमुळे या स्तरावर तुमचा कर प्रभावीपणे 'शून्य' होतो. जर हे नियोजन केले नाही, तर तुम्हाला १.१८ लाख रुपये कर भरावा लागला असता.

आयकर विभागाच्या नव्या कर प्रणालीमध्ये (न्यू टॅक्स रेजिम) सवलती मिळत नाहीत, असा सर्वसामान्यांचा समज आहे. वर्षाला २० लाख रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीला साधारणपणे १ लाख रुपयांहून अधिक कर भरावा लागतो. मात्र, आता एका विशेष ‘वेतन रचने’च्या (सॅलरी स्ट्रक्चर) मदतीने २० लाखांचे उत्पन्न असूनही तुमचा कर 'शून्य' होऊ शकतो. गुंतवणुकीपेक्षा तुमच्या वेतनाची रचना (सीटीसी स्ट्रक्चर) कशी आहे, यावर हे गणित अवलंबून आहे. त्यामुळे योग्य नियोजन करून करबचतीला सुरुवात करा.

गुंतवणुकीपेक्षा रचनेवर भरजुन्या कर पद्धतीत ८०-सी अंतर्गत बचत करून कर वाचवला जात असे. पण, नव्या पद्धतीत 'कॉस्ट टू कंपनी' (सीटीसी) मधील काही घटकांचा स्मार्ट वापर करणे फायद्याचे ठरते. जर तुमचे २० लाखांचे पॅकेज असेल आणि त्यातील ५० टक्के म्हणजे १० लाख रुपये मूळ वेतन (बेसिक सॅलरी) असेल, तर तुम्ही खालीलप्रमाणे कर वाचवू शकता. 

जेवणाचे भत्ते (मील अलाउन्स): यात वर्षाला १.०५ लाख रुपये करमुक्त मिळू शकतात. याचा फायदा होतो.ईपीएफ आणि एनपीएस : कंपनीकडून दिला जाणारा १२ टक्के ईपीएफ (१.२० लाख) आणि १४ टक्के एनपीएस योगदान (१.४० लाख) हे पूर्णपणे करमुक्त असते हे लक्षात ठेवा.स्थायी वजावट (स्टँडर्ड डिडक्शन): ७५ हजार रुपयांची सरसकट वजावट सर्वांना मिळते आहे.

कसे होईल कर गणित शून्य?: या सर्व वजावटींनंतर तुमचे २० लाखांचे उत्पन्न साधारण १२.११ लाखांवर येते. त्यातून ७५ हजारांची स्थायी वजावट वजा केल्यास करपात्र उत्पन्न ११.३६ लाख रुपये होते. नव्या कर पद्धतीतील सवलतींमुळे या स्तरावर तुमचा कर प्रभावीपणे 'शून्य' होतो. जर हे नियोजन केले नाही, तर तुम्हाला १.१८ लाख रुपये कर भरावा लागला असता. त्यामुळे कराबाबत योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

२० लाखांच्या पगारावर 'झीरो टॅक्स' गणित (नवीन कर पद्धत) (रु.) 

तपशील (वेतन घटक)कार लीजसह (₹)कार लीजशिवाय (₹)
एकूण वेतन (ग्रॉस CTC)20,00,00020,00,000
मूळ वेतन (बेसिक सॅलरी)10,00,00010,00,000
मिळणाऱ्या वजावटी  
1. जेवण भत्ता (मील कुपन्स)1,05,6001,05,600
2. कंपनीचे EPF योगदान1,20,0001,20,000
3. कंपनीचे NPS योगदान1,40,0001,40,000
4. कार लीज4,22,8320
निव्वळ पगार (नेट सॅलरी)12,11,40016,34,400
स्थायी वजावट (Standard Deduction)75,00075,000
एकूण करपात्र उत्पन्न11,36,40015,59,400
देय कर0 (टॅक्स रिबेटमुळे)1,18,466
English
हिंदी सारांश
Web Title : Zero Tax on ₹20 Lakh Package: Smart Salary Restructuring Tips

Web Summary : New tax regime allows zero tax on ₹20 lakh income through smart salary structuring. Focus on CTC components like meal allowances, EPF, and NPS contributions. Strategic planning is key for tax savings.
टॅग्स :इन्कम टॅक्सकर