महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना १ मेपासून मराठी अनिवार्य करण्यात येणार आहे. मराठी न येणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या निर्णयाला राज्यातील अमराठी आणि परप्रांतीय रिक्षाचालकांनी विरोध केला आहे. अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी मराठी सक्तीविरोधात ४ मे रोजी संप पुकारला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून मराठमोळा शिव ठाकरे पुढे आला आहे.
शिव ठाकरेने एक मोठा निर्णय घेतला असून त्याचं सर्वत्रच कौतुक होत आहे. अमराठी रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी शिव ठाकरे त्याची गाडी टॅक्सी म्हणून नागरिकांच्या सेवेसाठी रस्त्यावर उतरवणार आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. शिव ठाकरे इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये म्हटलं आहे की "राम राम महाराष्ट्र, ४ मे रोजी टॅक्सी ड्रायव्हरचा संप आहे. तरीही आपल्या सेवेमध्ये कुठेही आपणांस MH27 DK 0909 (टाटा हॅरिअर) तुमच्या हक्काची टॅक्सी रिक्षा कुठेही दिसल्यास हक्काने थांबवणे. आपली खूण एकच गाडीच्या पाठीमागे जय महाराष्ट्र आणि ड्रायव्हर सीटवर भगवा फेटा असलेला दादा आपल्या सेवेस सदैव तत्पर...काहीही हो... मराठी माणूस थांबता कामा नये...तुमचा आपला माणूस शिव ठाकरे".
शिव ठाकरेने घेतलेल्या या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. मराठी सक्ती विरोधात अमराठी रिक्षा चालकांनी दिलेल्या संपाच्या इशाऱ्यावर अनेक कलाकारांनीही त्यांची मतं मांडली आहे. मराठी शिकणार नाही, असं म्हणत मुजोरी करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा परवाना रद्द करण्याचा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. राज्यातील रिक्षा-टॅक्सीसह सर्व प्रकारच्या प्रवासी वाहनचालकांना मराठी भाषा शिकावीच लागेल. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, तर या वाहनचालकांना मराठीतून बोलावे लागेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
Web Summary : Amidst the auto driver strike protesting mandatory Marathi, Shiv Thackeray will offer his car as a taxi service. He aims to help commuters, emphasizing Marathi pride and service.
Web Summary : मराठी अनिवार्य के विरोध में ऑटो हड़ताल के बीच, शिव ठाकरे अपनी कार को टैक्सी सेवा के रूप में पेश करेंगे। उनका उद्देश्य यात्रियों की मदद करना, मराठी गौरव और सेवा पर जोर देना है।