दौंडमधील धक्कादायक प्रकार! विद्यार्थिनीचा बलात्कार करून खून करण्याची १०० रुपयांची सुपारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 20:50 IST2025-01-28T20:50:16+5:302025-01-28T20:50:31+5:30
शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारी घटना दाबण्याचा प्रयत्न करणारे शाळेच्या मुख्याध्यापकासह वर्ग शिक्षक, शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल

दौंडमधील धक्कादायक प्रकार! विद्यार्थिनीचा बलात्कार करून खून करण्याची १०० रुपयांची सुपारी
दौंड : दौंड येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा बलात्कार करून खून करण्याची विद्यार्थ्यांने सुपारी दिल्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान ही घटना दाबण्याचा प्रयत्न करणारे शाळेच्या मुख्याध्यापकासह वर्ग शिक्षक, शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने शाळेच्या कॅलेंडरवर पालकाची सही स्वतः केली होती. परिणामी माहिती इयत्ता सातवीतील एका विद्यार्थिनीने वर्ग शिक्षिकेला सांगितली. या प्रकारामुळे संबंधित मुलगा चिडला. दरम्यान शाळेतील अन्य एका विद्यार्थ्याला त्या मुलीचा बलात्कार करून खून करण्याची सुपारी दिली. चिडलेल्या त्या विद्यार्थ्याने शाळेतीलच दुसऱ्या विद्यार्थ्याला शंभर रुपये देऊन संबंधित मुलीचा बलात्कार करून खून करण्याची सुपारी दिली होती.
साधारणतः हा प्रकार २२ नोव्हेंबर २०२४ या महिन्यात घडला. परिणामी हा सर्व प्रकार मुलीच्या पालकामुळे उघडकीस आला. या प्रकरणी दौंड पोलीस स्टेशनला फिर्याद देण्यात आली. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपूर्वी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका या तिघांच्या विरोधात पीडित मुलीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यामुळे गुन्हा दाखल केला आहे. संबंधित मुलगी घरी गेल्यानंतर ती रडत होती. तेव्हा तू का रडत आहेस अशी विचारणा मुलीच्या वडिलांनी तसेच आईने केल्यामुळे मुलीने घडलेला सर्व प्रकार सांगितला तत्पूर्वी हा प्रकार संबंधित मुलीने मुख्याध्यापक आणि शिक्षकांना सांगितला होता. शाळा व्यवस्थापनाने या घटनेकडे दुर्लक्ष केले. एकंदरीत पोलिसांनी या घटनेची गेली दोन महिने चौकशी करून चौकशी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.