शेर था मेरा बॉस...! आंदेकर टोळी व त्यांच्या नंबरकारी सोशल मीडियावर स्टेटस ठेवणाऱ्यांवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 10:34 IST2025-10-04T10:33:35+5:302025-10-04T10:34:43+5:30
आरोपींनी शत्रुत्वाची भावना वाढवण्याच्या द्वेषबुद्धीने चुलत भावाचा खून करणाऱ्या आंदेकर टोळीतील आरोपींचे स्टेट्स ठेवल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे

शेर था मेरा बॉस...! आंदेकर टोळी व त्यांच्या नंबरकारी सोशल मीडियावर स्टेटस ठेवणाऱ्यांवर गुन्हा दाखल
पुणे : गुन्हेगारीला उत्तेजन देणाऱ्या आंदेकर टोळीचे व त्यांच्या नंबरकारी सोशल मीडियावर स्टेटस ठेवणाऱ्यांवर आता समर्थ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मंथन भालेराव (रा. मंजुळाबाई चाळ, नानापेठ, पुणे), ओम नगरकर, हर्षल पवार, पीयूष बिडकर, अथर्व नलावडे, ओमकार मेरगु, फेजल शेख (सर्व रा. नानापेठ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
५ सप्टेंबर रोजी आयुष कोमकर याचा आंदेकर टोळीतील आरोपींनी गोळ्या झाडून खून केला होता. या प्रकरणात बंडू आंदेकरसह त्याच्या टोळीला अटक झाली आहे. तसेच या प्रकरणात मोक्काची देखील कारवाई करण्यात आली आहे. १ ऑक्टोबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास तक्रारदार ह्या सोशल मीडिया पाहत असताना त्यांना त्यांच्या परिसरात राहणाऱ्या मंथन भालेराव यांच्या सोशल मीडियावर बदला तो होगा रिप्लाय फिक्स आता फक्त बॉड्या मोजा... शेर था मेरा बॉस.... वन ॲण्ड ओलनी कंपनी अशा आशयाचे स्टेट्स ठेवून पिस्तुलाचे चिन्ह ठेवले होते, तर ओम नगर याने एका आयडीवर बदला भी ऐसा लेंगे, रास्ते पर साबुन का पानी नही खून की नदीया बहेगी, कंपनी वापस आ रहे हे, वापस वही पुराने अंदाज मे, असे स्टेट्स ठेवले होते, तर खुनाच्या गुन्ह्यात अटक आरोपी स्वराज वाडेकर याच्या सोशल मीडियावर एक मॅसेज टॅग करून शेरोंका जमाना होता है, मिस यू स्वराज भाऊ अशा आशयाचा मजकूर पोस्ट केला होता, तर हर्षल पवार याने त्याच्या आयडीला आम्ही ट्रेल दाखवत बसत नाही, आम्ही डायरेक्ट पिक्चर दाखवतो असे स्टेटस ठेवले होते, तर मोहन गाडेकर याने फोटो स्टेटसला ठेवून मिस यु मोहन दादा असे स्टेटस ठेवले होते, तर मुनाफ पठाण याचा फोटो स्टेट्सला ठेवून त्यावर वेपनकिंग असे स्टेट्स पीयूष बिडकर, अथर्व नलावडे, ओमकार मेरगु यांनी स्टेटसला ठेवल्याचे दिसले. त्यामुळे आरोपींनी शत्रुत्वाची भावना वाढवण्याच्या द्वेषबुद्धीने आंदेकर टोळीतील आरोपींचे स्टेट्स ठेवल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.