पुणे रेल्वे स्थानकातील सुरक्षा यंत्रणा अत्यंत कमकुवत; समस्येची मेधा कुलकर्णी यांच्याकडून पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 11:01 IST2026-04-24T11:00:37+5:302026-04-24T11:01:28+5:30

पुणे रेल्वे स्थानकातील सुरक्षा व्यवस्था तातडीने मजबूत करावी. हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचना मेधा कुलकर्णी यांनी दिल्या आहेत

Security system at Pune railway station is very weak; Medha Kulkarni inspects the problem | पुणे रेल्वे स्थानकातील सुरक्षा यंत्रणा अत्यंत कमकुवत; समस्येची मेधा कुलकर्णी यांच्याकडून पाहणी

पुणे रेल्वे स्थानकातील सुरक्षा यंत्रणा अत्यंत कमकुवत; समस्येची मेधा कुलकर्णी यांच्याकडून पाहणी

पुणे : रेल्वेस्थानकावर प्रवाशांना येणाऱ्या अडचणी, समस्या याची दखल घेत राज्यसभा खासदार डाॅ. मेधा कुलकर्णी यांनी गुरुवारी (दि. २३) पुणे रेल्वेस्थानकाची पाहणी केली. त्यानंतर विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) राजेश वर्मा यांची भेट घेऊन स्थानक परिसरात रेल्वे विभागाने केलेल्या उपयायोजनांची माहिती घेत समस्यांबाबत चर्चा केली.

रेल्वेस्थानक परिसरात पाहणी करताना स्थानकात विनातिकीट फिरणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले. सुरक्षा यंत्रणा अत्यंत कमकुवत असल्याचे सांगत प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, घटना घडून गेल्यानंतरच त्रुटी शोधण्यापेक्षा त्या आधीच शोधून त्यावर गांभीर्याने निर्णय घ्यावेत. पुणे रेल्वे स्थानकातील सुरक्षा व्यवस्था तातडीने मजबूत करावी. हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचना मेधा कुलकर्णी यांनी राजेश वर्मा यांना दिल्या. स्थानक परिसरात व्यसनाधीन व्यक्तींची वर्दळ, चोरी, अत्याचार यासारख्या घटना वारंवार घडत असून, हे अत्यंत गंभीर आहे. या सर्व प्रकारांना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. यावेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी निधी उपलब्ध झाल्याचे समाधान व्यक्त केले, तर स्थानकावर तिकीट तपासणी करणारे अधिकारी (टीसी) अपुरे असून, ती संख्या वाढवावी. स्थानकावरील स्टॉल वाटप प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य द्यावे, असेही कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी स्थानिक कार्यकर्ते अनिल परदेशी यांच्यासह रेल्वेचे अधिकारी उपस्थित होते.

Web Title : पुणे रेलवे स्टेशन पर सुरक्षा कमजोर; मेधा कुलकर्णी ने मुद्दों का निरीक्षण किया

Web Summary : सांसद मेधा कुलकर्णी ने पुणे रेलवे स्टेशन का निरीक्षण किया, सुरक्षा में खामियां और बिना टिकट यात्रियों को पाया। उन्होंने अधिकारियों से सुरक्षा मजबूत करने, अपराध को संबोधित करने, टिकट जांचकर्ताओं को बढ़ाने और स्टालों के लिए स्थानीय विक्रेताओं को प्राथमिकता देने का आग्रह किया। सीसीटीवी फंड सुरक्षित।

Web Title : Pune Railway Station Security Weak; Medha Kulkarni Inspects Issues

Web Summary : MP Medha Kulkarni inspected Pune Railway Station, finding security lapses and ticketless travelers. She urged officials to strengthen security, address crime, increase ticket checkers, and prioritize local vendors for stalls. CCTV funds secured.