शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी आज

By admin | Updated: July 5, 2016 03:22 IST

अकरावी प्रवेशप्रक्रियेतील दुसऱ्या प्रवेश फेरीसाठीची गुणवत्ता यादी आज प्रसिद्ध केली जाणार आहे. दुसऱ्या फेरीसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ३६ हजार ७५२ जागा

पुणे : अकरावी प्रवेशप्रक्रियेतील दुसऱ्या प्रवेश फेरीसाठीची गुणवत्ता यादी आज प्रसिद्ध केली जाणार आहे. दुसऱ्या फेरीसाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये ३६ हजार ७५२ जागा उपलब्ध आहेत. पहिल्या फेरीतून ३६ हजार ६३३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे.इयत्ता अकरावी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत अकरावी प्रवेशासाठी आॅनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेत कला, वाणिज्य व विज्ञान शाखांमधील एकूण ७३ हजार ३८५ जागा उपलब्ध आहेत. आॅनलाइन अर्ज भरलेल्या ५२ हजार ६१६ विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीतून प्रवेशासाठी पात्र ठरविण्यात आले. त्यापैकी ३६ हजार ६३३ विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला आहे. पहिल्या फेरीत पात्र ठरलेले मात्र प्रवेश न घेतलेले विद्यार्थी या प्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. आता बेटरमेंटची संधी व पहिल्या फेरीत पात्र न ठरलेल्या विद्यार्थ्यांचा दुसऱ्या फेरीसाठी विचार केला जाणार आहे. पहिल्या फेरीत प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसह पालकांना दुसऱ्या यादीची प्रतीक्षा लागून राहिली आहे.पहिल्या फेरीतील प्रवेशानंतर प्रवेशाच्या ३६ हजार ७५२ जागा रिक्त राहिल्या आहेत. या फेरीसाठी उर्वरित सुमारे २० हजार विद्यार्थी पात्र ठरतील. ही गुणवत्ता यादी प्रवेश समितीमार्फत मंगळवारी सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. या फेरीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनाही सुरुवातीला ५० रुपये भरून प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यानंतर उर्वरित विद्यार्थ्यांसाठी तिसरी फेरी घेतली जाईल. आॅनलाइन प्रक्रियेत नोंदणी न केलेले, गुणवत्ता यादीत नाव असूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांचा विचार ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच केला जाणार आहे. एटीकेटी मिळालेले तसेच फेरपरीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचाही या वेळी विचार केला जाईल. त्यांना कशा पद्धतीने प्रवेश द्यायचे, याबाबत अद्याप समितीकडून काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.दुसऱ्या फेरीसाठी उपलब्ध जागाशाखामाध्यमप्रवेश दुसऱ्या फेरीसाठी क्षमतारिक्त जागाकलामराठी७९४०४९८७कलाइंग्रजी३३८०२०९५वाणिज्यमराठी१२३४०६२७२वाणिज्य इंग्रजी१८४५५८९४३विज्ञानइंग्रजी३१२७०१४४५५