शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातही रविवारपासून सलून होणार सुरू; पालिका आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2020 17:05 IST

सलून दुकाने सुरू करण्याबाबत शासनावर दबाव वाढत चालला होता..

ठळक मुद्देअटी व शर्तींचे पालन करण्याच्या सूचनादुकानांमध्ये केवळ केश कापणे, केसांना रंग देणे, वॅक्सिंग, थ्रेडिंग इत्यादी सेवा देण्यास परवानगीत्वचेशी निगडीत कोणत्याही प्रकारची सेवा देता येणार नसल्याचे आदेशात नमूदकर्मचाऱ्यांनी हातमोजे, एप्रन आणि मास्क आदी सुरक्षा साधनांचा वापर करणे अत्यावश्यक

पुणे : राज्यातील केश कर्तनालये, सलून आणि ब्युटी पार्लर्स सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर शनिवारी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनीही याबाबतचे आदेश दिले आहेत. केवळ पूर्व नियोजित वरील निश्चित करून ठरवून दिलेल्या अटी व शर्तींनुसारच दुकाने उघडता येणार आहेत. या आदेशामुळे नाभिक व्यावसायिक यांना दिलासा मिळाला असून चार महिन्यांनंतर सलून आणि ब्युटी पार्लर खुले होणार आहेत.ही दुकाने सुरू करण्याबाबत शासनावर दबाव वाढत चालला होता. नाभिक संघटनांसह सामाजिक संघटनांनी याविषयी निवेदने आणि पत्रव्यवहार करीत नाराजी व्यक्त करायलाही सुरुवात केली होती. 'अनलॉक'च्या चौथ्या टप्प्यात ही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. दुकानांमध्ये केवळ केश कापणे, केसांना रंग देणे, वॅक्सिंग, थ्रेडिंग इत्यादी सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, त्वचेशी निगडीत कोणत्याही प्रकारची सेवा देता येणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. कोणत्या सेवा देता येणार आहेत किंवा देता येणार नाहीत याची माहिती दुकानावर माहिती फलकाद्वारे प्रदर्शित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. दुकानातील कर्मचाऱ्यांनी हातमोजे, एप्रन आणि मास्क आदी सुरक्षा साधनांचा वापर करणे अत्यावश्यक आहे. दुकानात सर्व ठिकाणी, खुर्च्या, दुकानातील मोकळी जागा, फरशी आदी गोष्टी दर दोन तासांनंतर सॅनिटाईज करूम घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. दुकानात येणा-या ग्राहकांसाठी केवळ एकदाच वापरता येणा?्या (डीस्पोजेबल) टॉवेल, नॅपकिन वापर करावा. जी उपकरणे एकदा वापरण्याजोगी नाहीत (नॉन डीस्पोजेबल) अशी साधने प्रत्येक सेवेनंतर सॅनिटाईज करणे तसेच त्याचे निजंर्तुकीकरण करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक दुकानावर कोरोनासंदर्भात काळजी घेण्यासंदर्भात तसेच जनजागृतीबाबत नोटीस ग्राहकांच्या काळजीसाठी दर्शनी भागात लावणे आवश्यक असल्याचे गायकवाड यांनी आदेशात नमूद केले आहे.

टॅग्स :PuneपुणेHair Care Tipsकेसांची काळजीState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका