शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

‘मी शपथ घेतो की...’ आरटीओ देणार शपथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 20:01 IST

शिकाऊ किंवा पक्क्या वाहन परवान्यासाठीच्या चाचणीपुर्वी आता प्रत्येकाला वाहतुक नियमांचे पालन करण्याची शपथ घ्यावी लागणार आहे...

ठळक मुद्देप्रत्येक उमेदवाराला ही शपथ बंधनकारक राहणार पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून त्याचा शनिवार (दि. २) पासून अंमलबजावणी सुरू

पुणे : शिकाऊ किंवा पक्क्या वाहन परवान्यासाठीच्या चाचणीपुर्वी आता प्रत्येकाला वाहतुक नियमांचे पालन करण्याची शपथ घ्यावी लागणार आहे. याबाबत परिवहन विभागाने शुक्रवारी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालयांना सुचना दिल्या आहेत. त्यानुसार त्याची अंमलबजावणीही सुरू करण्यात आली आहे.सुरक्षित रस्ते वाहतुकीसाठी परिवहन विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. केंद्र सरकारने नुकताच कायद्यात बदल करून दंडाच्या रकमेत मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. तसेच अपघात कमी करण्यासाठी विविध तरतुदीही करण्यात आल्या आहेत. सध्या वाहन चालन परवाना देण्यापुर्वी उमेदवारांना चाचणी द्यावी लागते. ही चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतरच त्यांना परवाना मिळतो. शिकाऊ व पक्का परवान्यासाठी वेगळी चाचणी असते. आता या चाचण्यांपुर्वी प्रत्येक उमेदवारांना वाहतुक नियमांची शपथ देण्याचे आदेश परिवहन विभागाने दिले आहेत. त्यासाठी पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्टने शपथ तयार केली आहे. वाहन चालकांना जबाबदारीचे भान करून देणे व त्यातून वाहतुक नियमांविषयी चालकांमध्ये सजगता निर्माण करणे, हा त्यामागचा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही शपथ मराठी व इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये असून उमेदवारांना त्यांच्या सोयीनुसार दोनपैकी कोणत्याही एका भाषेतून शपथ घेता येईल. शपथ घेतल्यानंतर त्याखाली उमेदवाराचे नाव, स्वाक्षरी व दिनांक नमुद करावे लागणार आहे. प्रत्येक उमेदवाराला ही शपथ बंधनकारक राहणार आहे. दरम्यान, परिवहन विभागाच्या आदेशानुसार, पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून त्याचा शनिवार (दि. २) पासून अंमलबजावणी सुरू केली आहे. मुख्यालय, आयडीटीआर, आळंदी रस्ता आणि शिबीर कार्यालयाच्या ठिकाणी शिकाऊ व पक्क्या परवानाच्या चाचणीसाठी उपस्थित सर्व उमेदवारांना शपथ देण्यात आली. ----------------------------अशी असेल शपथ...- मी दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करेन तसेच माझ्या दुचाकीवरून प्रवास करणाºया दुसºया सहप्रवाशाला देखील हेल्मेट घालण्यास प्रवृत्त करेन.- मी वाहन चालविताना माझे मन विचलित करणाºया मोबाईल वापरणे व त्यावरून मजकूर पाठविणे यासारख्या व्यत्ययाना टाळेन.- मी रस्त्यावर कुठलाही हिसंक रोष/आवेशीत कृत्य व्यक्त करण्याचे टाळेन- मी कधीही मद्यपान करून वाहन चालवणार नाही.- मी कधीही लेन कापणार नाही किंवा रस्त्याच्या चुकीच्या बाजूने वाहन चालवणार नाही. -----------------

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसtwo wheelerटू व्हीलरfour wheelerफोर व्हीलर