शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
2
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
3
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
4
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
5
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
6
Baramati Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
7
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
8
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
9
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
10
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
11
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
12
Numerology: 'या' जन्मतारखेचे लोक असतात अति संवेदनशील; सभोवतालच्या वातावरणाचा खोलवर होतो परिणाम
13
थलापती विजयचे राज्यभरात ८५ हजार फॅन क्लब्स; TVK च्या विजयात निभावली सर्वात मोठी भूमिका
14
आसनसोलमध्ये तृणमूलच्या कार्यालयात तोडफोड, बॉम्ब सापडला; ममता बॅनर्जींच्या घराबाहेर 'जय श्री राम'च्या घोषणा
15
केरळमध्ये 'या' पक्षाने अवघ्या २७ जागा लढवल्या, त्यातील २३ जागांवर पुढे; २१ उमेदवार मुस्लीम
16
Thalapathy Vijay Net Worth: अभिनेता ते राजकारणी; ६०० कोटींपेक्षा अधिकचं साम्राज्य, कशी आहे थलापति विजय यांची लक्झरी लाईफ 
17
लग्नानंतर सासरची पायरी चढण्याआधीच मोडला संसार! २०० रुपयांच्या नोटेमुळे नवरदेवाचा असा झाला भांडाफोड
18
तीन राज्यं जिंकली, पण दोन राज्यांत भाजपाची निराशा; भोपळा फोडला, पण हवं तसं 'कमळ' फुलेना!
19
दाक्षिणात्य सुपरस्टार विजयला 'थलापती' का म्हणतात? जाणून घ्या ३२ वर्षे जुनी कहाणी!
20
IPL 2026: RCBला मोठा धक्का! तुफान घोडदौड सुरू असताना स्टार खेळाडू संघ सोडून घरी परतला
Daily Top 2Weekly Top 5

मार्केट यार्डात किरकोळ, डमी विक्रेते, रिक्षाला बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. बाजारातील किरकोळ विक्रेते, डमी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. बाजारातील किरकोळ विक्रेते, डमी व लिंबू विक्रेत्यांवर सोमवार (दि.१९) पासून बंदी घातली आहे. रिक्षाला प्रवेश दिला जाणार नाही. तर पास असेल तरच बाजारात प्रवेश दिला जाणार आहे. किरकोळ विक्रीही थांबविली आहे. आडते आणि खरेदीदारांना बाजार समितीकडून पास दिले जातील. प्रवेशद्वारावर ओळखपत्र आणि पास दाखविल्याशिवाय बाजारात प्रवेश दिला जाणार नाही, अशी माहिती बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.

मधुकांत गरड म्हणाले की, सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी बाजाराची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या बैठकीत गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले. बाजारात सुमारे दोन हजार डमी विक्रेते आहेत. हे विक्रेते गाळ्यासमोर थांबून विक्री करीत असतात. हे डमी किरकोळ विक्री करीत असल्याने ग्राहकांचीही गर्दी होते. त्यामुळे डमी तसेच लिंबू विक्रेत्यांवर बंदी घातली आहे. आडत्यासह चार पास दिले जाणार आहेत. तसेच खरेदीसाठी येणाऱ्यांनाही पास दिला जाणार आहे. शेतीमाल माल घेऊन येणाऱ्या गाड्यांना एक नंबरच्या प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाणार आहे, तर खरेदीदारांच्या गाड्यांना ४ नंबरच्या प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाणार असल्याचेही गरड यांनी नमूद केले.

पास असेल तरच वाहनतळावर वाहन लावण्यास परवानगी दिली जाणार आहे. बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी, पोलीस आणि वाहतूक पोलीस सयुक्तरीत्या गर्दी कमी करण्यासाठी उपाय-योजना करणार आहेत. बाजारातील गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ३० पोलीस कर्मचारी असणार आहेत. नियम मोडणाऱ्यांवर हे पोलीस दंडात्मक कारवाई करणार आहेत. किरकोळ खरेदी करणार्‍यांना प्रवेश दिला जाणार नसल्याने गर्दी कमी होणार आहे. गुळ-भुसार विभागातही शनिवारी तसेच रविवारी माल घेऊन येणाऱ्या गाड्यांना त्या त्या गाळ्यासमोर थांबण्याची परवानगी दिली आहे. मात्र सोमवारी दुपारी १२ नंतर या गाड्यांतील माल उतरवून घेता येणार असल्याचेही मधुकांत गरड यांनी सांगितले.

------

नियम मोडाल तर कारवाई

मार्केट यार्डातील विविध विभागात माल घेऊन येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच खरेदी करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे येथे गर्दी होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या आहेत. पाळीनुसार पोलिसांच्या नियुक्त्या केल्या आहेत. हे पोलीस बाजारातील परिस्थितीवर लक्ष ठेवून असणार आहेत. सोमवारपासून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.

-----

सर्व रस्त्यांवर बॅरिकेड्स

मार्केट यार्डात येणाऱ्या रस्त्यांवर सोमवारपासून बॅरिकेड्स लावणार आहेत. बिबवेवाडी रस्ता, शिवनेरी रस्ता, पोस्ट ऑफिस कार्यालयासह छोट्या रस्त्यांवरही बॅरिकेड्स लावले जाणार आहेत. अन्य रस्त्यांवरून बाजारात येणाऱ्या रस्त्यांवर बंदी घातली आहे. त्यामुळे सोमवारपासून पास असेल, तरच विविध विभागात प्रवेश दिला जाणार आहे. अन्यथा मार्केट यार्डात जाणाऱ्यांना रिकाम्या हातांनी परतावे लागणार आहे.